शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

देशभरातील ‘जेईई’ विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या सनीचे धडे

By सुमेध उघडे | Updated: January 5, 2020 08:05 IST

‘जेईई’च्या अभ्यासातील बौद्धिक व मानसिक अडचणी काही विद्यार्थी ‘क्योरा’ या वेबसाईटवर मांडतात. औरंगाबादच्या सनी धोंडकर याने या अडचणीवर तो कशी मात करतो, हे सांगितले.

ठळक मुद्देसनीच्या पद्धती वेगळ्या आणि अत्यंत सोप्या असल्याने अल्पावधीतच संपूर्ण देशभरातून हजारो विद्यार्थी त्याला फॉलो करीत आहेत.सर्वात अवघड प्रश्नाच्या उत्तराला ७० हजार लाईक्स‘कन्सेप्ट मॅप्स’चे लाखभर डाऊनलोड 

- सुमेध उघडे

औरंगाबाद : ‘जेईई’ अर्थात जॉइंट एन्ट्रस एक्झामिनेशन या देशपातळीवरील अभियांत्रिकीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्योरा या ‘फ्री एक्सेस’ वेबसाईटच्या माध्यमातून नुकताच आयआयटी मुंबईत प्रवेश घेतलेला औरंगाबादचा सनी धोंडकर हा विद्यार्थी मार्गदर्शन करीत आहे. विशेष म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी देशभरात सुप्रसिद्ध असलेले राजस्थानमधील कोटा येथील विद्यार्थीसुद्धा त्याच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. 

देशभरात अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ मेन्स व अ‍ॅडव्हान्स ही एकच प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी देशभरातून जवळपास १४ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. प्रचंड स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा आणि अभ्यास यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि मानसिक पातळीवर कस लागतो. याच्या मार्गदर्शनासाठी अनेक कोचिंग क्लास आणि विविध पुस्तके उपलब्ध आहेत. यासोबतच अभ्यासात असलेली एका सोबत्याची आवश्यकता सोशल मीडियाने देखील भरून काढली आहे. ‘जेईई’च्या अभ्यासातील बौद्धिक व मानसिक अडचणी काही विद्यार्थी ‘क्योरा’ या वेबसाईटवर मांडतात. औरंगाबादच्या सनी धोंडकर याने या अडचणीवर तो कशी मात करतो, हे सांगितले. अभ्यास व यादरम्यान येणाऱ्या ताणतणावावर मात करण्याच्या सनीच्या पद्धती वेगळ्या आणि अत्यंत सोप्या असल्याने अल्पावधीतच संपूर्ण देशभरातून हजारो विद्यार्थी त्याला फॉलो करीत आहेत. या माध्यमातून आणि ईमेल करून कोटा, दिल्ली, तामिळनाडू, मुंबई, बंगळुरू, उत्तर प्रदेश येथील विद्यार्थी आपल्या शंकांचे निरसन त्याच्याकडून करून घेतात. 

सर्वात अवघड प्रश्नाच्या उत्तराला ७० हजार लाईक्ससनीने यावर्षी ‘जेईई-२०१९’ ही परीक्षा दिली असून तो आता आयआयटी मुंबई येथे पुढील शिक्षण घेत आहे. या परीक्षेत सर्वात अवघड प्रश्न कोणता होता, असा प्रश्न ‘क्योरा’वर विचारण्यात आला. तेव्हा जो प्रश्न सोडविण्यास अनेक विद्यार्थ्यांना १५ मिनिटे लागली तो प्रश्न सनीने केवळ ४ मिनिटांत सोडवला. यासाठी त्याने वापरलेल्या उत्तराच्या पद्धतीस ७० हजार फॉलोअर्सनी लाईक केले आहे.

‘कन्सेप्ट मॅप्स’चे लाखभर डाऊनलोड अभ्यास प्रभावी पद्धतीने कसा करावा, असे अनेक विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर सनीने स्वत: तयार केलेला ‘कन्सेप्ट मॅप्स’ शेअर केला. यात एक संपूर्ण धडा एकाच कागदावर उतरवून आकलनास सोपा कसा करायचा, हे मांडले आहे. गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून याचे पीडीएफ त्याने सर्वाना मोफत उपलब्ध करून दिले आहे. याची उपयुक्तता लक्षात आल्याने आतापर्यंत याचे लाखभर डाऊनलोड आणि शेअर झाले आहेत. 

५ वीत विज्ञानकथा; ९ वीत पहिले पुस्तक सनीला लहानपणासून वाचन लिखाणाचा छंद असून त्याने पाचवीत असतानाच विज्ञाना कथा लिहिल्या होत्या. त्या वाचून त्याची आई दीपमाला आणि प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर यांनी त्याला प्रोत्साहन दिले. पुढे ९ वीत असताना त्याने विज्ञानातील उत्सुकता निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर ‘थिअरी वर्सेस थिअरीज’ हे पुस्तक लिहिले. 

‘इन्फो मेमे’ची धूम अभ्यासादरम्यान तणाव कमी करण्यासाठी सनीने ‘इन्फो मेमे’ ही संकल्पना राबवली. फेसबुक पेजवर आणि क्योरावर विचारलेल्या काही प्रश्नांना त्याने विनोदाचा स्पर्श असणाऱ्या ‘मेमे’मधून समर्पक उत्तरे दिली. या पद्धतीने अभ्यासातील तणाव कमी तर झाला; पण आकलनही झाल्याने ‘इन्फो मेमे’ची विद्यार्थ्यांमध्ये धूम झाली. 

‘दी जेईई’ विद्यार्थ्यांचा मित्र सोशल मीडियावर ‘जेईई’वरील प्रश्नांची उत्तरे देताना वेळ आणि जागेची कमतरता येत होती. यातून अभ्यासाच्या सोप्या पद्धती एकाच ठिकाणी मांडत सनीने ‘द जेईई’ हे पुस्तक लिहिले आहे. यात ‘जेईई’च्या अभ्यासातील सोप्या पद्धती, अभ्यासातील अडचणी आणि तणाव कसा दूर करावा, यावर स्वानुभवाचे बोल मांडले आहेत.

माझे अनुभव पुस्तकरूपात मला अभ्यासादरम्यान आलेल्या अडचणी इतर विद्यार्थ्यांना येऊ नयेत यासाठी मी सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतर वेळचे नियोजन होत नसल्याने माझे अनुभव पुस्तकरूपात मांडले आहेत. सोशल मीडियात अनेक विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत मला फॉलो करीत असल्याने जबाबदारीची जाणीव झाली आहे. - सनी धोंडकर, विद्यार्थी, आयआयटी, मुंबई 

टॅग्स :Educationशिक्षणIIT Mumbaiआयआयटी मुंबईStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद