शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

औरंगाबादचा पुंडलिकनगर रस्ता बनला अनधिकृत कचरा डेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 7:06 PM

पुंडलिकनगर मुख्य रस्त्यावर जागोजागी कचर्‍याचे ढीग साचल्याने हा रस्ता अनधिकृत कचरा डेपोच बनला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ९३ पुंडलिकनगर भागात कचर्‍याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने व सध्या घंटागाडी येत नसल्याने नागरिक मुख्य रस्त्यावरच कचरा आणून टाकत आहेत.

औरंगाबाद : पुंडलिकनगर मुख्य रस्त्यावर जागोजागी कचर्‍याचे ढीग साचल्याने हा रस्ता अनधिकृत कचरा डेपोच बनला आहे. कचरा जागेवरच सडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. कचरा वेळेत उचलला गेला नाही, तर रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

कचरा प्रश्नावरून नाचक्की होऊनही महापालिकेने काहीच बोध घेतलेला नाही. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ९३ पुंडलिकनगर भागात कचर्‍याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने व सध्या घंटागाडी येत नसल्याने नागरिक मुख्य रस्त्यावरच कचरा आणून टाकत आहेत. जयभवानीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गजानन महाराज मंदिर या दोन ते अडीच किलोमीटर रस्त्यावर तब्बल १९ ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे हा रस्ता अनधिकृत कचरा डेपोच बनला आहे. महापालिकेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने जागेवरच सडत आहे.

काही नागरिक रस्त्यावरच कचरा जाळत असून, त्यावर पुन्हा कचरा टाकला जात आहे. या भागातील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना दुर्गंधीबरोबरच धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगतचे नागरिक तर त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ रुग्णालय, खाजगी शिकवणी शाळा आहेत. लहान मुलांसह शाळकरी विद्यार्थी व नागरिक येथून ये-जा करतात. दुर्गंधीमुळे त्यांना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. या भागातील कचर्‍याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कचर्‍यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, कुत्रे वाहनांना आडवे येत असल्याने वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने रस्त्यावरील कचरा वेळेत उचलला नाही तर रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

या ठिकाणी साचले कचर्‍याचे ढीग ...पुंडलिकनगर रस्त्यावरील सॅमसंग शोरूम, संत रोहिदास चौक, सेवालाल महाराज चौक, संभाजीराजे चौक, नागापूरकर हॉस्पिटल, बी.एस.जी.एम. स्कूल, पुंडलिकनगर गल्ली नं. ११, गल्ली नं. १०, गल्ली नं. ९, गल्ली नं. ६, गल्ली नं. ५ शिवाजी पुतळा पाठीमागील बाजूस, गल्ली नं. १, कै. पुंडलिक राऊत चौक, महाराणा प्रताप चौक, कुलस्वामिनी दूध डेअरीसमोर, श्री स्वामी समर्थ चौक, मेहदी आर्ट हॉस्पिटल, सृष्टी हॉस्पिटल, मलकापूर बँकेसमोर आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

बाजूच्या वॉर्डामुळे आम्हाला त्रासकचर्‍याची समस्या निर्माण होताच किमान आपल्या वॉर्डात ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून काही मोकळ्या जागा असलेल्या ठिकाणी वॉर्डातील कचरा कंपोस्ट करून विल्हेवाट लावली जात आहे. बाजूच्या वॉर्डातील नागरिकांकडून ये-जा करताच रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्याचा आम्हाला त्रास होत आहे, असे पुंडलिकनगरच्या नगरसेविका मीना गायके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो