शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक होणार ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 5:13 PM

२८ प्लॅटफार्म, चित्रपटगृह, खुले उपाहारगृह इत्याची आधुनिक सुविधांचा समावेश 

ठळक मुद्देजुनी इमारत पाडून होणार उभारणी मध्यवर्ती बसस्थानक येत्या दीड वर्षात स्मार्ट होणार

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, मराठवाड्याची राजधानी, आॅटोमोबाईल इंडस्ट्रीच्या हबपाठोपाठ आता शिक्षणाची आळंदी होत असलेल्या औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येत्या दीड वर्षात स्मार्ट होत आहे. जुनी इमारत पाडून नवीन मॉडर्न इमारत उभी राहणार आहे. २८ प्लॅटफार्मपासून ते खुले उपाहारगृह, चित्रपटगृहापर्यंत सर्व सोयी-सुविधा त्यात असणार आहेत. प्रत्येक शहरवासीयाला अभिमान वाटावा, असे बसस्थानक निर्माण होणार आहे. 

राज्यातील बहुतांश बसस्थानके जुनी झाली आहेत. यातील काही बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यातील एक औरंगाबादमधील मध्यवर्ती बसस्थानक होय. या बसस्थानकाची इमारत मोडकळीस आली आहे. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. ४.६ एकर जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक उभारले जाणार आहे. वास्तुविशारदाने दिलेला नवीन नकाशा व प्राथमिक अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता सविस्तर अंदाजपत्रकाचे कामही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. अद्ययावत बसस्थानकाची नवीन इमारत इंग्रजी ‘वाय’ या आकारातील असणार आहे. बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्वेस राहील. ते प्रशस्त व देखणे असेल. ऐतिहासिक शहराची ओळख जपत या प्रवेशगृहाच्या दक्षिण व उत्तर बाजूला येथील बीबी का मकबरा, पाणचक्की, शहरातील दरवाजे, देवगिरी किल्ला, जागतिक वारसा असलेले वेरूळ व अजिंठा लेणी याचे सर्वांना दर्शन होईल. फायबर म्युरलमध्ये या प्रतिकृती बनविण्यात येणार आहेत. येथून आत गेल्यावर भव्य ‘क्रश हॉल’ असेल. त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असेल. पुढे उजव्या व डाव्या बाजूस जेनेरिक मेडिकल स्टोअर्स असतील. याशिवाय तिकीट आरक्षण कार्यालय, वाहतूक नियंत्रण कार्यालय, पार्सल रूम, महिलांसाठी हिरकणी कक्षही आहेत. तसेच शिवशाही, शिवनेरीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित कक्ष असतील.  सध्याच्या बसस्थानकात १७ प्लॅटफार्म आहेत. मात्र, नवीन बसस्थानकात २८ प्लॅटफार्म असतील. प्रथम दोन्ही बाजंूस प्रत्येकी ८-८ प्लॅटफार्म, त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच पुढील बाजूस प्रत्येकी ६-६ प्लॅटफार्म व त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असतील.   मध्यभागी मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) असेल. येथून सर्व २८ प्लॅटफार्म दिसू शकतात, अशी रचना या कक्षाची करण्यात आली आहे. आसपास १२ छोटी दुकाने उभारण्यात येणार आहेत, तसेच विनावाहक गाड्यांच्या तिकिटासाठी ४ स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था असेल.  हे सर्व प्लॅटफार्म छताने अच्छादित असतील. या मॉडर्न मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रस्तावित इमारतीसाठी १८ कोटी २९ लाखांची मंजुरी राज्य शासनाने दिली आहे. 

दोन ठिकाणी वाहनतळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन ठिकाणी सुमारे सव्वा एकर जागेवर वाहनतळे करण्यात येतील. आप्तेष्टांना बसमध्ये बसवून त्वरित निघून जाणाऱ्या वाहनधारकांच्या दुचाकी व चारचाकीसाठी बसस्थानकाच्या समोरील बाजूस वाहतळ असेल. वाहन उभे करून गावाला जायचे आहे, अशांसाठी बसस्थानकाच्या उत्तरेस (जिथे निवासस्थाने होती) वाहनतळ असेल. त्याच ठिकाणी समोरील बाजूस रिक्षास्टँडसाठी जागा ठेवण्यात आली आहे. बसस्थानकामधून उत्तर बाजूस वाहनतळामध्ये वाहन घेण्यासाठी प्रवाशांना जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. 

पाणी फेरभरणसंपूर्ण बसस्थानकाचे पाणी फेरभरण करण्यात येणार आहे. अंडरग्राऊंड वॉटर टँक करण्यात येईल. पावसाळ्यात जमा झालेल्या पाण्यावरच वर्षभर बसस्थानकात पाणी पुरविले जाणार आहे. याशिवाय बसस्थानकाला ग्रीन बिल्डिंगची संकल्पना येथे राबविण्यात येईल. 

पहिला मजलापहिल्या मजल्यावर उत्तर दिशेला १०० ते १२० आसनक्षमतेचे चित्रपटगृह संकल्पीत आहे, तर दक्षिण बाजूस वाहक व चालकांना राहण्यासाठी प्रशस्त हॉल, अकाऊंट कार्यालय असेल. तसेच वाहक-चालकांच्या  खुली व्यायामशाळा,  इनडोअर गेम्स, तसेच पहिल्यावर खुले उपहारगृह असेल, अशी माहिती वास्तुविशारद करणसिंह ठाकूर यांनी दिली. 

२५ वर्षांनंतरही अद्ययावत वाटेल असे असेल बसस्थानकभविष्यातील स्मार्ट सिटी व लोकसंख्या वाढीचा विचार करून मध्यवर्ती बसस्थानकाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. बसस्थानकावर नव्हे तर विमानतळावर आल्यासारखे प्रत्येकाला वाटेल व औरंगाबादकरांना अभिमान वाटेल, असे बसस्थानक उभारण्यात येईल. पुढील २५ वर्षांनंतरही अद्ययावत वाटेल, असे बसस्थानक राहील. - अजय ठाकूर, आर्किटेक्ट

टॅग्स :Aurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकstate transportएसटीpassengerप्रवासी