शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:35 AM

शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले.

ठळक मुद्देकचऱ्याचा प्रश्न कायम : मनपाच्या कामांची निव्वळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले. त्यांनी जिल्हा कचेरीत कचरा प्रश्नाचा आढावा घेतला. कॅरिबॅग बंदीची अंमलबजावणी करावी, कच-याचे वर्गीकरण करा, कामाची क्षमता वाढवा एवढाच सल्ला देऊन ते भुर्रकन निघून गेले. कचरा प्रश्नात ठोस असा कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता तर पालकमंत्री कशासाठी आले होते, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.शहरातील कचºयाचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून मिटमिटा येथे दंगलही उसळली होती. एवढे सर्व होत असताना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत औैरंगाबाद शहराकडे फिरकले नाहीत.नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी एकदा ते आले होते. त्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री आहेत किंवा नाही, अशी अवस्था निर्माण झालेली असताना शनिवारी शहरात त्यांनी एन्ट्री मारली. महापालिकेकडून जिथे कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे, त्या केंद्रांना त्यांनी भेट देऊन कामाची प्रशंसा केली.मध्यवर्ती जकात नाका, चिश्तिया चौैक, बळीराम पाटील चौक येथे पाहणी केली. सत्यविष्णू हॉस्पिटल येथे ओल्या कचºयापासून होणारी खतनिर्मिती, रमानगर येथील प्रकल्पाची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही त्यांनी घेतली.यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, आ. संदीपान भुमरे, सीईओ मधुकर आर्दड, नगरसेवक राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर आदी उपस्थित होते.शहरात फक्त ५ टक्के कचराजिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सध्या शहरात केवळ सातशे टन (पाच टक्के) कचरा रस्त्यावर आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात १५ हजार मेट्रिक टन निर्माण झाला होता. त्यातील १४ हजार ६४६ मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे, सध्या केवळ पाच टक्के म्हणजे, ७०२ मेट्रिक टन कचरा रस्त्यावर पडून असल्याचा दावा त्यांनी केला. कचºयापासून खतनिर्मिती करण्यासाठी पूर्वी ३५ पीट (खड्डे) घेण्यात आले होते. आता ७७ पीट तयार करण्यात आले आहेत.पात्रकमंत्र्यांनी दिली सूचनांची पंचसूत्रीघनकचरा व्यवस्थापनाबाबत कामाची गती वाढविण्यात यावी. अधिकाºयांनी सतर्कता बाळगावी. समन्वय ठेवून काम करावे.सफाई कामगार आणि कचरा वेचकांना ग्लोज, मास्क, गम बूट इत्यादी साहित्य द्यावे.सफाई कर्मचारी आणि कचरा वेचकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी.कचरा वेचकांना ओळखपत्र देण्यात यावे.कामाची गती अधिक तीव्र करण्यात यावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादdr. deepak sawantदीपक सावंतNavalkishor Ramनवलकिशोर राम