औरंगाबादचे प्राणीसंग्रहालय होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे; अतिरिक्त जागा आणि निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:13 IST2021-07-13T19:12:13+5:302021-07-13T19:13:24+5:30

महापालिकेमार्फत सिद्धार्थ उद्यानात १४ एकर जागेवर प्राणीसंग्रहालय कार्यरत असून ते मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे.

Aurangabad Zoo to be of international standard; CM directs to send proposals for additional space and funds | औरंगाबादचे प्राणीसंग्रहालय होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे; अतिरिक्त जागा आणि निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

औरंगाबादचे प्राणीसंग्रहालय होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे; अतिरिक्त जागा आणि निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठळक मुद्देऔरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. शहरांतर्गत पर्यटनस्थळं ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र झाली पाहिजेत

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेले प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. त्यादृष्टीने लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे आज झालेल्या येथे बैठकीदरम्यान दिले.

वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल यांच्यासह महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तीककुमार पान्डेय यावेळी उपस्थित होते.

औरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करताना वेरूळ, अजिंठा लेण्यांप्रमाणे शहरांतर्गत पर्यटनस्थळं ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र झाली पाहिजेत हे विचारात घेऊन प्राणीसंग्रहालयाचे काम झाले पाहिजे. औरंगाबादमध्ये आलेल्या पर्यटकांनी आवर्जून त्याला भेट दिली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महापालिकेमार्फत सिद्धार्थ उद्यानात १४ एकर जागेवर प्राणीसंग्रहालय कार्यरत असून ते मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे. येथे ससे, नीलगाय, हरिण, मोर, कोल्हे, लांडगे, तरस, सिंह, अस्वल, वाघ, हत्ती आदी वन्ययजीव आहेत. या प्राणीसंग्रहालयाला जागा कमी पडत असल्याने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधीकरणाने दाखविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी व मानकांनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिटमिटा येथे ४० हेक्टरवर प्राणीसंग्रहालयाचे काम सुरू आहे. या प्राणीसंग्रहालयास तसेच सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागा लागणार असल्याने त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Web Title: Aurangabad Zoo to be of international standard; CM directs to send proposals for additional space and funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.