जी-२० परिषदेसाठी येणारी विदेशी पाहुणे देणार औरंगाबादला भेट

By विकास राऊत | Updated: September 1, 2022 18:16 IST2022-09-01T18:14:26+5:302022-09-01T18:16:14+5:30

यासाठी येत्या सॊमवारी स्वागत समिती याबाबत बैठक घेणार आहे. 

Aurangabad will be visited by foreign delegations coming to the G-20 conference | जी-२० परिषदेसाठी येणारी विदेशी पाहुणे देणार औरंगाबादला भेट

जी-२० परिषदेसाठी येणारी विदेशी पाहुणे देणार औरंगाबादला भेट

औरंगाबाद: जी-२० परिषद नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या काळात होणार असून, कोरिया व जपान सह अन्य काही देशांचे शिष्टमंडळ औरंगाबाद भेटीवर येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी येत्या सॊमवारी स्वागत समिती याबाबत बैठक घेणार आहे. 

समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असून यात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आदी विभाग प्रमुख असतील. मे महिन्यात परिषद सदस्य औरंगबादेत आले होते. त्यानंतर परिषद मध्ये सहभागी होणार असलेले काही आंतरराष्ट्रीय पाहुणे औरंगाबादला येतील. येथे त्यांचे अजिंठा-वेरूळ लेणीला भेटीचे नियोजन आहे. 

Web Title: Aurangabad will be visited by foreign delegations coming to the G-20 conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.