लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला. शहरातील १५ लाख नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झालेले असताना मात्र नियोजनाचे राजकारण सुरू झाले आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनीच पाण्याचा प्रश्न हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा दावा केला. दोन दिवसाआड पाणी देण्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊन प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १३५ एमएलडी पाणीपुरवठा रोज होत असताना नियोजनाने दोन दिवसांआड पाणी शहराला दिले जाऊ शकते. संपूर्ण शहरात दोन दिवसांआडच पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. तीन दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक का केले? याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल, नियमित आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात करू, असे त्यांनी गुरुवारी (दि.१०) स्पष्ट केले. प्रभारी आयुक्तांना अधिकाºयांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा महापौरांनी केला.शहरातील पाण्याचे वेळापत्रक गेल्या दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ओरड व आंदोलने सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ‘झोपा काढा’ आंदोलन केले. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बैठक घेऊन संपूर्ण शहराला समान पाणी देण्यासाठी तीन दिवसांआडचे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले. नव्या वेळापत्रकाला मंजुरीही देण्यात आली. शुक्रवारपासून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, तीन दिवसांआड पाणी देण्यास महापौरांनी विरोध केला होता. सध्या १३५ एमएलडी दररोज पाणी मिळते. दोन दिवसांत हे पाणी २७० एमएलडी होते. फक्त प्रशासनाचे नियोजन नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. शहराला दररोज २२५ एमएलडी पाण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे मत आहे.पाण्यासाठी शहर व्याकुळप्रत्येक नागरिकाच्या ५७ ते ६० लिटर पाण्याची चोरी होण्याचा अंदाज आहे. जायकवाडीतून १५६ पैकी १४७ ते १५० एमएलडी पाणी उपसले जाते.शहराला येते १२० ते १३० एमएलडी पाणी येते. २५ ते ३० एमएलडी पाण्याची चोरी होते. शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या पुढे-मागे आहे. दरडोई १३५ लिटर पाणी देण्याचा नियम आहे. मनपाकडून ७८ ते ८० लिटर पाणी दरडोई पुरविले जात नाही.
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:30 IST
शहरातील पाणीपुरवठ्याचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे वेळापत्रक कोलमडण्यामागे प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. शिवेसना आणि भाजपमध्ये भांडणे लावण्यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दडल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी गुरुवारी केला.
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ
ठळक मुद्देशाश्वतीच नाही : हलगर्जीपणा झाकण्यासाठी बदलले वेळापत्रक