शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारास हायवा ट्रकने उडवले; मृत्यूचा सापळा ठरलेल्या बायपासवर ८ महिन्यात गेला १० वा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:20 IST

देवळाई चौकात हायवा ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : बीड बायपासवर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवळाई चौकात हायवा ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक  (३२,रा.कटकट गेट ) असे मृताचे नाव असून तो बायपासवरून बदनापूरच्या दिशेने निघाला होता. या मार्गावर मागील आठ महिन्यातील हा ८ वा बळी गेला आहे. 

अब्दुल अजीमचे संग्राम नगर उड्डाणपुलाजवळ एका पेट्रोल पंपावर गॅरेज होते. आज सकाळी तो गॅरेजच्या कामासाठीच बदनापूरकडे निघाला होता. देवळाई चौकात छत्रपती नगरजवळ पाठीमागून आलेल्या एका हायावा ट्रकने त्याच्या गाडीला धडक दिली. यामुळे तो गाडीसह रत्यावर कोसळला आणि गंभीर जखमी झाला. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 

यानंतर पोलिसांनी हायावा ट्रक पोलीस स्थानकात उभी केली असून चालकाची चौकशी सुरु आहे. सततच्या अपघाताने बायपास मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार संजय सिरसाट आणि हर्षवर्धन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मनपाचे पथकसुद्धा येथे दाखल झाले आहे.  

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली असून बायपासवर वाहतूक शिस्तीसाठी कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.  

बायपास रोड मृत्यूचा सापळाबायपास मृत्यूचा सापळा ठरला असून, आठ महिन्यांत या मार्गावर बळींची संख्या  संख्या १० वर पोहोचली आहे. शाळकरी मुलांसह पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिता आल्हाट ही गरोदर महिला, मिस्त्री, साताऱ्यातील युवक मॉर्निंग वॉकला जाताना त्याला बजाज दवाखान्यासमोर अज्ञात वाहनाने उडविले. एमआयटीसमोर एक चिप्स विक्रेता, पैठण रोडवर डॉ. सारिका तांदळे, देवडानगर येथे एका मोपेडवरील महिलेला ट्रकने चिरडले आदी घटनांत ९ जणांचा बळी गेला आहे. यानंतर आज हा दहावा बळी ठरला आहे.  एवढ्या अपघाताच्या घटना घडत आहेत; परंतु सर्व्हिस रोडचा मुद्दा मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद