शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पर्यटन अनलॉक : पर्यटकांसाठी पुन्हा खुलले ऐतिहासिक सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:28 IST

Aurangabad Tourism Unlock : अनलॉकदरम्यान इतर पर्यटन स्थळे सुरू झाली असली तरी औरंगाबादचे पर्यटन मात्र बंदच होते.

ठळक मुद्देपर्यटन स्थळांच्या तिकीट खिडक्यांवर दिसलेली रांग पर्यटन जगताला नवी संजीवनी देणारी ठरली. पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना, उद्योजकांना दिलासा मिळाला.  

औरंगाबाद : पर्यटकांअभावी मागील ९ महिन्यांपासून बंदिस्त असलेल्या ऐतिहासिक स्मारकांची, पर्यटनस्थळांची द्वारे गुरुवारी सकाळीच उघडण्यात आली आणि पुन्हा एकदा शहर आणि परिसरातले ऐतिहासिक सौंदर्य पर्यटकांना भेटण्यासाठी खुलून आले. 

अनलॉकदरम्यान इतर पर्यटन स्थळे सुरू झाली असली तरी औरंगाबादचे पर्यटन मात्र बंदच होते. गुरुवारी औरंगाबाद  शहरातील पर्यटन स्थळे खुली झाली आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना, उद्योजकांना दिलासा मिळाला.  पर्यटन स्थळांच्या तिकीट खिडक्यांवर दिसलेली रांग पर्यटन जगताला नवी संजीवनी देणारी ठरली. बीबी का मकबरा परिसरात पहिले आलेल्या पर्यटकांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. आपण आज या ऐतिहासिक क्षणाचे पहिलेवहिले साक्षीदार ठरलो आहोत, याचा आनंदही पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसून आला. क्यूआर कोड स्कॅनिंग करून ऑनलाइन माध्यमातून तिकिटे काढूनच पर्यटकांना प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक पर्यटकाची अतिशय शिस्तबद्ध तपासणी आणि सॅनिटायझेशन केल्याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षारक्षक सज्ज होते. नेहमीच्या तुलनेत पर्यटनस्थळी खूपच कमी फेरीवाले दिसून आले. त्यांच्या वस्तूंची पहिल्या दिवशी विशेष  विक्री झाली नाही; परंतु लवकरच आता आपलाही व्यवसाय सुरू होईल, अशी आशा मात्र त्यांना नक्कीच होती. 

क्यूआर कोड स्कॅन करताना अडचणीवेरूळ लेणी परिसरात सकाळच्या सत्रात जवळपास ३०० पर्यटकांची उपस्थिती होती. दिवसभरातून अंदाजे ५०० पर्यटक याठिकाणी येऊन गेले. पहिल्या दिवशी अंदाजे २५० जणांनी बीबी का मकबरा पाहिला, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी आलेले बहुतांश पर्यटक हे औरंगाबाद शहर आणि आसपासच्या गावांतून आले होते.सवयीचे नसल्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन तिकीट काढणे अनेकांना त्रासदायक झाले होते.  स्कॅनिंग कसे करायचे, ऑनलाइन पेमेंट कसे करायचे, याबाबत अनेक पर्यटक संभ्रमावस्थेत दिसून आले. क्यूआर कोड आणि स्कॅनिंग पहिल्यांदाच होत असल्याने पर्यटनस्थळी असलेली तांत्रिक टीमही पर्यटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सज्ज होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनAjantha - Elloraअजंठा वेरूळ