शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे

By admin | Updated: May 22, 2014 00:33 IST

पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़

पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़ सिकंदराबाद-मनमाड या रेल्वे मार्गावर धावणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली असून, विशेषत: मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्‍या भाविकांची संख्या जास्त आहे़ सद्यस्थितीतील रेल्वे गाड्या प्रवाशांच्या तुलनेमध्ये अपुर्‍या पडत असल्यामुळे तिरुपतीला जाणार्‍या भाविकांची गैरसोय होत आहे़ ही अडचण लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती (गाडी क्रमांक ०७४०५) औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३ वाजता सोडण्यात येणार आहे़ सिकंदराबादमार्गे जाणार्‍या या रेल्वे गाडीच्या मार्गावरील सर्वच प्रमुख स्थानकावर थांबा देण्यात आला आहे़ ही रेल्वे गाडी नांदेड रेल्वेस्थानकावर सायंकाळी ७़३० वाजता पोहचणार आहे़ या विशेष रेल्वे गाडीला १५ डब्बे राहणार असून, वातानुकूलित डब्बा जोडण्यात आला आहे़ परतीचा मार्ग २४ मे रोजी तिरुपती- औरंगाबाद (गाडी क्रमांक ०७४०६) तिरुपती रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५़१० वाजता सुटणार आहे़ ही गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर २५ मे रोजी सकाळी ९ वाजता पोहचणार आहे़ या दोन्ही गाड्यांमुळे तिरुपतीला जाणार्‍या- येणार्‍या भाविकांची सोय होणार आहे़ (प्रतिनिधी) भाविकांची गैरसोय झाली दूर सध्या मराठवाड्यातून तिरुपती बालाजीला भाविक मोठ्या संख्येने रेल्वेने जात आहेत़ अपुर्‍या रेल्वे संख्येमुळे भाविकांची गैरसोय होऊ लागली होती़ त्यामुळे रेल्वे विभागाने एक विशेष रेल्वे गाडी सोडल्याने भाविकांची गैरसोय दूर झाली आहे़ यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे़