शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

शहागंज बसस्थानक ते 'बसपोर्ट' कडे औरंगाबाद ' एसटी'ची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:41 PM

शहरात मध्यवर्ती, सिडको बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याकडे 'एसटी'ची वाटचाल सुरु आहे.

ठळक मुद्दे ११ जून १९६४ रोजी औरंगाबादचे विभागीय कार्यालय सुरु झाले.३ नोव्हेंबर १९७८ रोजी मध्यवर्ती तर २१ मार्च १९८६ रोजी सिडको बसस्थानक सुरू झाले.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन १ जून रोजी साजरा होत आहे. या ७० वर्षाच्या कालावधीत 'एसटी' ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. औरंगाबादेत एकेकाळी शहागंज आणि रेल्वेस्टेशन स्थानकातून बस धावत होत्या. शहरात मध्यवर्ती, सिडको बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याकडे 'एसटी'ची वाटचाल सुरु आहे. 'लालपरी' म्हणजे साधी बस, निमआराम बससोबतच शिवनेरी बरोबर वातानुकूलित शिवशाही बस दाखल झाली असून 'एसटी' खाजगी बससेवेला चांगलीच टक्कर देत आहे.

राज्यात पहिली एसटी बस १ जून १९४८ रोजी धावली. पुणे ते अहमदनगर मार्गावर लाकडी बॉडी आणि आजुबाजुला कापडी कव्हर लावलेली ही पहिली बस होती. एसटी महामंडळाची सुरुवात १९४८ मध्ये झालेली असली तरी मराठवाडा हा निजामाच्या जोखडात असल्याने तेव्हा औरंगाबादसह मराठवाड्यात निजाम स्टेट रेल्वे रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट या नावाने प्रवासी वाहतूक चालविण्यात येत होती. १९६० मध्ये  मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा सुरू झाली. त्यावेळी मराठवाड्यात पाच जिल्हे होते. जिल्ह्याचे विभागीय कार्यालय औरंगाबादेत होते. त्यावेळी औरंगाबादेत रेल्वेस्टेशन आणि शहागंज येथे बसस्थानक होते. पहिले विभाग नियंत्रक म्हणून मेजर यु. जी. देशमुख कार्यरत होते.

सेवेत झाला कालानुरूप बदल ११ जून १९६४ रोजी औरंगाबादचे विभागीय कार्यालय सुरु झाले. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी मध्यवर्ती तर २१ मार्च १९८६ रोजी सिडको बसस्थानक सुरू झाले. तेव्हापासून तर २०१८ या कालावधीत 'एसटी' ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. औरंगाबाद विभागात मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकासह सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, कन्नड ही आठ आगार आहेत.  विभागात १५ फेब्रुवारी १९९९ रोजी पहिली महिला वाहक रूजू झाली. सध्या साधी बस, निमआराम बससोबतच अत्याधुनिक सेवाही सुरू  आहेत. यात 'शिवनेरी' बरोबर वातानुकूलित शिवशाही आसन आणि स्लीपर बसही दाखल झाली. प्रवासी वाहतूक क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेत एसटी महामंडळ दमदार वाटचाल करीत आहे. विभागीय कार्यशाळा व चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा कार्यरत आहे. मध्यवर्ती कार्यशाळेत जुन्या 'एस. टी.' च्या पुनर्बांधणीसह स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टी) 'एसटी'ने आकार घेत आहे.

बसपोर्टची प्रतीक्षा एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी आता सिडको बसस्थानकात बसपोर्ट उभारणीसंदर्भात चाचपणी सुरू आहे.

वटवृक्षात रुपांतर१ जून रोजी एसटी महामंडळ ७० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. राज्यात एका बसपासून सुरुवात झाली होती. आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.- प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

औरंगाबाद विभागातील परिस्थितीबस प्रकार         संख्यासाधी बस (लाल) -४५६हिरकणी बस (निमआराम)- ५८ शिवनेरी बस  - ८ शितल बस  - ५ शिवशाही बस  - ४१ शिवशाही स्लीपर बस - २शहर बस - ४६ यशवंती (मिडी बस ) - १६  एकूण   - ६३२ 

विभागातील दररोजची स्थितीदररोज एकूण बस फेऱ्या - २ हजार ५७१दररोज कि.मी.अंतर - १.९१ लाख कि.मी.दररोज प्रवासी संख्या  - १.६० लाखदररोज उत्पन्न  - ६० लाख रुपये

टॅग्स :state transportएसटीAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक