शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
2
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
3
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
4
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
5
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
6
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
7
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
8
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 
9
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
10
चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
11
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
12
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
13
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
14
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
15
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
16
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
17
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
18
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
19
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
20
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन

औरंगाबादचे रस्ते गुन्हेगारांना मोकळे; दीड महिन्यात गंभीर गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 15:46 IST

नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यात गंभीर गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी

ठळक मुद्देशहरात गुंडांची वाढती दहशत किरकोळ कारणावरून थेट शस्त्राने हल्ला करण्याचे गुन्हे वाढले

औरंगाबाद : खून, खुनाचा प्रयत्न, मंगळसूत्र चोरी आणि धारदार वस्तूने मारहाण करून लुटमारीच्या घटनांनी नव्या वर्षातील दीड महिन्यातच शतक  पार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चाकू, सुऱ्यासह तलवारीसारखे घातक शस्त्र सोबत घेऊन फिरताहेत. किरकोळ कारणावरून थेट शस्त्राने हल्ला करण्याचे गुन्हे वाढले आहेत. 

शिवजयंती मिरवणुकीत पुंडलिकनगरात श्रीकांत गोपीचंद शिंदे या २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेच्या तीन दिवस आधीच आरोपींनी भारतनगरात एका तरुणाला घराबाहेर बोलावून प्राणघातक हल्ला केला होता. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गुलमंडीतील नगारखाना गल्लीतील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात घुसून व्यवस्थापकाचा निर्घृण खून करून आरोपी पसार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. शहरातील गुंड उघडपणे तलवार घेऊन फिरण्याएवढे निर्भय झाले आहेत. यातूनच फ्लिपकार्टसारख्या आॅनलाईन बाजारातून शहरातील ४० हून अधिक तरुणांनी तलवारी मागविल्या होत्या. पोलिसांना न जुमानता शिवजयंती मिरवणुकीत अनेक तरुण तलवारीसह सहभागी झाले होते. तलवारीसह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सशस्त्र हाणामारीच्या घटना शहरात सतत घडत आहेत. गुंडांना ट्रॅप करण्यासाठी पोलिसांकडून अचानक राबविले जाणारे ‘आॅपरेशन आॅल आऊट’ सारख्या मोहिमा कमी झाल्याने गुन्हेगारी फोफावते आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शस्त्राने हल्ला केल्याच्या तब्बल १०९ घटनाशस्त्राने मारहाण करून दुखापत करण्याच्या तब्बल १०९ घटनांची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे, तर  दुचाकीस्वार चोरट्यांनी विविध ७ ठिकाणांहून पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले. या घटना समर्थनगर, उल्कानगरी, ज्योतीनगर, जवाहरनगर, छावणी आणि सातारा परिसरात घडल्या. लुटमार आणि जबरी चोरीच्या तब्बल एक डझन घटनांची नोंद शहरात झाली.  

गतवर्षीच्या तुलनेत रस्त्यावरील वाटमारी, जबरी चोरी,मंगळसूत्र चोरीच्या घटना कमी झाल्या. मारहाण करून साधी व गंभीर दुखापत करण्याच्या घटना घडल्या आहेत. तलवारी घेऊन फिरणाऱ्यांची माहिती मिळताच पोलिसांकडून लगेच त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाते.     - निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस