सत्ता आहे तर 'संभाजीनगर' करून टाका; हिंदू-मुस्लीम दरी निर्माण करण्याची गरज नाही : विनायक मेटे

By सुमेध उघडे | Published: January 9, 2021 07:22 PM2021-01-09T19:22:39+5:302021-01-09T19:24:05+5:30

Aurangabad rename आगामी काळात शिवसंग्राम पक्ष मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम व ब्राह्मण आरक्षणाची लढाई लढणार

Aurangabad rename : If there is power, make it 'Sambhajinagar'; No need to create Hindu-Muslim divide: Vinayak Mete | सत्ता आहे तर 'संभाजीनगर' करून टाका; हिंदू-मुस्लीम दरी निर्माण करण्याची गरज नाही : विनायक मेटे

सत्ता आहे तर 'संभाजीनगर' करून टाका; हिंदू-मुस्लीम दरी निर्माण करण्याची गरज नाही : विनायक मेटे

googlenewsNext
ठळक मुद्देअशोकराव चव्हाण हे अनेक गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत नाहीत. आता हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा शिवसेनेने हाती घेतलेला आहे. आता सत्ता आहे तर हे नामांतर करून टाकले पाहिजे. या मुद्द्यावर हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याची गरज नाही असा टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी शिवसेनेला लगावला. 

शनिवारी तापडिया नाट्यमंदिरात ते शिवसंग्रामच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलत होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, शिवसेनेने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा हाती घेतलेला आहे. त्यांची आता सत्ता आहे तर नामांतर करून टाकले पाहिजे. या मुद्द्यावर हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याची गरज नाही. यापूर्वीच विद्यापीठ नामांतराच्या जखमा ताज्या आहेत याची आठवण त्यांनी करून दिली. मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, अशोकराव चव्हाण हे अनेक गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत नाहीत. आता हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीस त्यांनी चव्हाण यांना बोलावलेही नव्हते. ते बाजूच्या खोलीत बसून राहिले आणि मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांना सुनावले, अशा बातम्या ते पेरीत राहिले.
 

आगामी काळात इतर समाजाच्या आरक्षणाची लढाई
आगामी काळात शिवसंग्राम पक्ष मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम व ब्राह्मण आरक्षणाची लढाई तेवढ्याच ताकदीने लढणार आहे. येत्या मार्चमध्ये विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मेटे यांनी केली.

Web Title: Aurangabad rename : If there is power, make it 'Sambhajinagar'; No need to create Hindu-Muslim divide: Vinayak Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.