औरंगाबाद- पुणे गृहप्रदर्शन उद्यापासून

By Admin | Updated: February 19, 2016 00:02 IST2016-02-18T23:54:23+5:302016-02-19T00:02:05+5:30

औरंगाबाद : कोणी औरंगाबादेत तर कोणी पुण्यात घर खरेदीसाठी इच्छुक आहेत. अशा गृहेच्छुकांसाठी खुशखबर म्हणजे २० फेब्रुवारीपासून शहरात ‘लोकमत प्रॉपर्टी शो-२०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

Aurangabad-Pune home-show from tomorrow | औरंगाबाद- पुणे गृहप्रदर्शन उद्यापासून

औरंगाबाद- पुणे गृहप्रदर्शन उद्यापासून

औरंगाबाद : कोणी औरंगाबादेत तर कोणी पुण्यात घर खरेदीसाठी इच्छुक आहेत. अशा गृहेच्छुकांसाठी खुशखबर म्हणजे २० फेब्रुवारीपासून शहरात ‘लोकमत प्रॉपर्टी शो-२०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या गृहप्रदर्शनात एकाच छताखाली या दोन्ही महानगरांतील नामांकित बिल्डर्सच्या विविध दर्जेदार गृहप्रकल्पांची माहिती मिळणार
आहे.
अदालत रोडवरील तापडिया-कासलीवाल मैदानावर २० व २१ फेब्रुवारी दोन दिवस ‘लोकमत प्रॉपर्टी शो’ भरविण्यात येणार आहे. एरव्ही या दोन्ही महानगरांतील विविध गृहप्रकल्प पाहण्यात ग्राहकांना वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला असता; पण या गृहप्रकल्पात एकाच ठिकाणी दोन्ही महानगरांतील ५० पेक्षा अधिक बिल्डर्सच्या शेकडो गृहप्रकल्पांची सविस्तर माहिती मिळणार आहे.
याशिवाय गृहकर्ज मिळवून देण्यासाठी बँकांचे स्टॉलही येथे असणार आहेत. परिणामी गृहेच्छुकांचा पैसा व वेळ याची मोठी बचत होणार आहे. झपाट्याने वाढणाऱ्या औरंगाबाद व पुणे शहरातील नामांकित बिल्डर्ससोबत प्लॉटिंग सर्व्हिस, बांधकाम साहित्य वितरक, इंटेरिअर डेकोरेटर्स, फर्निचरचाही समावेश असणार आहे. यामुळे घरासंदर्भातील परिपूर्ण प्रदर्शन पाहण्याची संधी गृहेच्छुकांना मिळाली आहे.
‘लोकमत’ तर्फे आयोजित या प्रदर्शनासाठी असोसिएट स्पॉन्सर सारा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, व्हेन्यू पार्टनर तापडिया- कासलीवाल प्रॉपर्टीज् तसेच आऊटडोअर पार्टनर अभिषेक अ‍ॅडव्हर्टायझिंग हे आहेत.

Web Title: Aurangabad-Pune home-show from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.