औरंगाबाद: घाटी रुग्णालयातून कैदी पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 09:23 IST2018-04-23T09:23:30+5:302018-04-23T09:23:43+5:30

मेडिसिन वॉर्डाच्या बाहेरून उपचारासाठी आणलेले दोन कैदी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना घडली.

Aurangabad: Prisoner run away from the hospital | औरंगाबाद: घाटी रुग्णालयातून कैदी पळाला

औरंगाबाद: घाटी रुग्णालयातून कैदी पळाला

औरंगाबाद: घाटी शासकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल  परिसरातील मेडिसिन वॉर्डाच्या बाहेरून उपचारासाठी आणलेले दोन कैदी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना घडली. आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या दोन कैद्यांपैकी एकाला पकडण्यात यश आले. मात्र एक जण सोनू दिलीप वाघमारे नामक कैदी पळून जाण्यात यशस्वी ठरला. छातीत दुखत आहे असे सांगून तो चार दिवसापुर्वी घाटीत दाखल झाला होता आज सकाळी पोलिसासोबत झटापट करून पळाला. यावेळी घाटी रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक आणि शेकडो लोकांसमोर हा प्रकार घडला. पसार झालेल्या कैदीस शोधण्याची मोहीम तात्काळ तीव्र करण्यात आली.

 

Web Title: Aurangabad: Prisoner run away from the hospital