शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

औरंगाबादचा पाईप घोटाळा; दोषी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:10 AM

समांतर जलवाहिनीच्या कंपनीने विविध वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या पाईपची खरेदी केली होती. यातील तब्बल १२ कोटी रुपयांचे पाईप गायब असल्याची बाब समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता. मनपा प्रशासनाने पाईप घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमली. मागील दीड महिन्यात समितीचा अहवालच प्राप्त झालेला नाही.

ठळक मुद्देदीड महिना उलटला : १२ कोटींची फिकीर ना प्रशासनाला, ना पदाधिका-यांना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कंपनीने विविध वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या पाईपची खरेदी केली होती. यातील तब्बल १२ कोटी रुपयांचे पाईप गायब असल्याची बाब समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता. मनपा प्रशासनाने पाईप घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमली. मागील दीड महिन्यात समितीचा अहवालच प्राप्त झालेला नाही.औरंगाबाद युटिलिटी कंपनीने कोट्यवधी रुपयांचे पाईप खरेदी केले. कंपनीच्या सिडको येथील कार्यालयात हे पाईप आल्यावर नगरसेवकांची पाईप घेण्यासाठी झुंबड उडाली होती. रेटारेटी, दादागिरी करून अनेक नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डांमध्ये हे पाईप नेऊन ठेवले. गरज नसतानाही पाईपचा ढीग लावून ठेवण्यात आला होता. १४ महिन्यांच्या कार्यकाळानंतर मनपाने कंपनीची हकालपट्टी केली. कंपनीने दिलेले पाईप विविध वॉर्डांमध्ये, महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये पडून होते. नंतर हळूहळू पाईपला पाय फुटले. सर्व पाईप एका वर्षात गायब झाले. तब्बल १२ कोटी रुपयांचे हे पाईप गायब झाल्याची बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ने १ डिसेंबरच्या अंकात याविषयी सविस्तर वृत्तही प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनास चौकशीचे आदेश दिले होते. मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. चौकशी समितीला मात्र हवी असलेली कागदपत्रे, कोणाला किती पाईप दिले याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे चौकशीला विलंब होत असल्याचे समोर येत आहे. चौकशी समितीला अधिकारी, कर्मचारी सहकार्य करीत नसतील, तर दोषींवर दोषारोपपत्र ठेवून अंतिम अहवाल सादर करावा, असे निर्देशही महापौरांनी दिले.‘त्याच’ व्यासाची कामेमागील दोन महिन्यांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाईप बदलण्याची कामे मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहेत. समांतर जलवाहिनीच्या कंपनीने १००, १५०, २०० मि.मी. व्यासाचे पाईप वाटले होते. याच व्यासाची कामे सध्या मनपाकडे प्रगतिपथावर आहेत.आत्ताच एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे काढण्याचे औचित्य काय? सेटिंग कोणाची?महापालिकेने कोट्यवधी रुपयांची विकासकामे काढली आहेत. कंपनीचे गायब झालेले पाईप परत मनपाच्या विकासकामांमध्ये वापरण्याचा घाट काही कंत्राटदार मंडळींनी रचल्याची चर्चाही मनपा वर्तुळात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सेटिंग कोणी लावली, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.