गाडीत प्रवासी भरण्यावरुन दोन खासगी चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, औरंगाबादच्या सिडको भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 15:57 IST2021-12-05T15:55:19+5:302021-12-05T15:57:33+5:30

या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय, त्या व्हिडिओत चालक एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत.

Aurangabad News: Free Style Fighting between Private Bus Drivers for passengers | गाडीत प्रवासी भरण्यावरुन दोन खासगी चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, औरंगाबादच्या सिडको भागातील घटना

गाडीत प्रवासी भरण्यावरुन दोन खासगी चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, औरंगाबादच्या सिडको भागातील घटना

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून सुरू एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अनेक ठिकाणी संप मागे घेण्यात आला आहे, पण अजूनही काही ठिकाणी संप सुुरू आहे. या संप काळात प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यांना खासगी वाहनांवर अवलंबुन राहावं लागलं. या काळात खासगी वाहन चालकांमध्येही प्रवासी भरण्यावरुन चढाओढ पाहायला मिलत होती. अशाच एका चढाओढीत दोन चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. 

औरंगाबादच्या सिडको बस स्टँड भागात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने येत आहेत. एसटीच्या संपामुळे प्रवाशांना या घासगी वाहनांमधून प्रवास करावा लागतोय. यातच वाहन भरण्यासाठी चालकांची चढाओढ पाहायला मिलत आहे. पण, आज याच चढाओढचे हाणामारीत रुपांतर झाले. सिडको बस स्थानकाजवळ दोन चालकांमध्ये प्रवाशांना आपल्या गाडीत बसवण्यावरुन हाणामारी झाली.

या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत दोन्ही चालक एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारी करताना दिसत आहेत. काहीवेळ दोघांमध्ये हाणामारी झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी दोघांमधील वाद मिटवला. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

Web Title: Aurangabad News: Free Style Fighting between Private Bus Drivers for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.