शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये 'स्पेशल 26' सारखी घटना; माजी नगराध्यक्षाच्या दुकानावर तोतया सीबीआयची रेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 19:50 IST

Aurangabad News: पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर तोतया सीबीआय अधिकाऱ्याची रेड.

पैठण: तुम्ही अक्षय कुमारचा 'स्पेशल 26' हा चित्रपट पाहिला असेल. त्यात अक्षय कुमार आणि त्याची टीम कधी तोतया सीबीआय अधिकारी तर कधी इनकम टॅक्स अधिकारी बनून धाडी मारत असतात. तसाच प्रकार पैठणमध्ये घडला आहे. पैठणच्या माजी नगराध्यक्षाच्या दुकानावर अशाच प्रकारची तोतया धाड पडली. विशेष म्हणजे या प्रकरणाचा मास्टर माईंड पैठण येथील भाजपाचाच ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून रघुनाथ ईच्छैय्या असे त्याचे नाव आहे. या तोतया धाडीने पैठण शहरातील सराफा पेढीत मोठी खळबळ उडाली, दुपारनंतर दुकाने बंद करून व्यापारी पोलीस ठाण्यात जमा झाले. 

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर एका सीबीआय अधिकाऱ्याने रेड केल्याची माहिती समोर आली. यावेळी त्या तोतया अधिकाऱ्याने लोळगे यांच्या दुकानात पैशांची मागणी केली. मात्र त्याच्या हालचालींवर संशय आल्याने सुरज लोळगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याची चौकशी केली आणि त्याला ताब्यात घेतले. 

50 लाखांची मागणीसुरज लोळगे आपल्या सोन्याच्या दुकानात बसले होते. यावेळी विट्ठल हरगुडे नावाचा व्यक्ती दुकानात आला. त्याच्या हातात एक फाईल होती. त्याने लोळगे यांना सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगितले. पण त्याच्या बोलण्यावर सुरज यांना संशय आला. तोतया अधिकाऱ्याने सुरज लोळगे यांच्याकडे चौकशी रफादफा करायची असेल तर 50 लाखांची मागणी केली. यानंतर सुरज लोळगे यांनी दुकानातून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांना फोन करून माहिती दिली. तातडीने उपविभागीय अधिकारी नेहूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांनी दुकानात जाऊन सीबीआय अधिकाऱ्याची चौकशी केली. यावेळी आरोपी कमालीचा गोंधळला आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

भाजप पदाधिकारी मास्टरमाईंडतोतया सीबीआय अधिकारी बनून आलेल्या अधिकाऱ्याचे नाव विठ्ठल नामदेव हारगुडे(50 रा. पुणे) आहे. दरम्यान पोलिसांनी हारगुडेस ताब्यात घेतल्याचे समजताच कारमध्ये बसलेला त्याचा साथीदार डॉ. घाटे(रा. पुणे) हा कार घेऊन फरार झाला. पोलीसांनी हारगुडे याच्याकडे केलेल्या चौकशीत या प्रकरणाचा मास्टरमाइंड पैठण येथील भाजपाचा ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी रघुनाथ ईच्छैय्या असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी रघुनाथ ईच्छैय्या, त्याचा चालक व एक साथिदार अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत या प्रकरणात आणखी गुन्हेगारांचा समावेश आहे का हे समोर येणार आहे. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpaithan-acपैठणCBIगुन्हा अन्वेषण विभागraidधाडPoliceपोलिस