औरंगाबादेत जलकुंभावर मध्यरात्री पालिका कर्मचाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:02 IST2018-10-30T23:00:53+5:302018-10-30T23:02:02+5:30
महापालिकेच्या अनियमित पाणीपुरवठ्याला कंटाळलेल्या संतप्त जमावाने सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५ येथील जलकुंभावरील चार कर्मचाºयांना बेदम मारहाण केली.

औरंगाबादेत जलकुंभावर मध्यरात्री पालिका कर्मचाऱ्याला मारहाण
औरंगाबाद : महापालिकेच्या अनियमित पाणीपुरवठ्याला कंटाळलेल्या संतप्त जमावाने सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५ येथील जलकुंभावरील चार कर्मचाºयांना बेदम मारहाण केली. यात एका कर्मचाºयाचा दातही पडला. या निषेधार्थ पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी जलकुंभावरच कामबंद करून ठिय्या आंदोलन केले. हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन मनपा पदाधिकारी, आयुक्तांनी दिल्यानंतर कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेतले.
काशीनाथ लालमन राठोड, भीमसिंग रामसिंग परदेशी, तानाजी शिवराम पोटकुळे, देवदत्त अशोक दांडगे, अशी जखमी कर्मचाºयांची नावे आहेत. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संतप्त जमाव सिडको एन-५ येथील जलकुंभावर चालून आला. हडको, एन-१२ भागात पाणी का सोडले नाही, असा जाब विचारत जमावाने कर्मचाºयांना मारहाण केली. उपअभियंता अशोक पद्मे यांना ही माहिती त्वरित देण्यात आली. लालमन राठोड यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकी व इतर वाहनांमधून आलेले हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कॅ मेºयाचे फुटेज तपासले. हे फुटेज पोलिसांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी ही माहिती मिळताच टँकरचालक, लाईनमन यांनी बहुजन शक्ती कामगार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा बनकर यांच्या नेतृत्वाखाली जलकुंभावर ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात येईल. त्यासाठी आम्ही स्वत: पोलीस आयुक्तांची भेट घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलीस आयुक्तांची भेट
मनपा पदाधिकारी व अधिकाºयांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची दुपारी भेट घेतली. मनपा मुख्यालय, महत्त्वाच्या जलकुंभावर जमाव चालून येतो. या भागात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी के ली. महापौर घोडेले यांनी सांगितले की, महापालिकेकडे असलेले माजी सैनिक जलकुंभावर तैनात के ले जातील. महापालिकेकडे अतिक्रमण हटावसाठी २७ पोलीस कर्मचारी व एक अधिकारी आहे. हे कर्मचारी इतर कामे करण्यास नकार देतात. शहरात महिना-महिना अतिक्रमण हटावच्या कारवाया होत नाहीत. पोलिसांना बसून पगार देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. इतर कामांसाठीदेखील या पोलिसांचा वापर व्हावा, यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.