शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 6:12 PM

गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील ५० हून अधिक वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. मात्र यातील काही वॉर्डांची पाहणी केली असता, गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील समतानगर, भाग्यनगर, जयविश्वभारती, सिल्लेखाना, पैठण गेट, गांधीनगर, दलालवाडी वॉर्डातील कचऱ्याच्या स्थितीचा आढावा ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला असता यातील बहुतांश वॉर्डांतील गल्लीबोळांमध्ये कचरा आढळून आला नाही. अनेक छोट्या रस्त्यांवर महिनाभरापूर्वी असणारा कचरा उचलण्यात आला आहे.

तसेच काही वॉर्डांत एक दिवसाला तर काही ठिकाणी दोन दिवसाला कचऱ्याची गाडी येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मात्र वॉर्डातील संकलन केलेला कचरा विघटनासाठी कोठेही घेऊन न जाता थेट त्या वॉर्डांच्या जवळपास असलेल्या सार्वजनिक जागेच्या परिसरात, रस्त्याच्या कडेला टाकल्याचे प्रत्येक वॉर्डात आढळून आले. या प्रकाराविषयी नागरिकांना विचारले असता, बहुतांश जणांनी अगोदर गल्लीत असणारा कचरा किमान रहदारीच्या घरांपासून थोडा फार दूर गेला. याचेही समाधान असल्याचे सांगितले. मात्र रस्त्यांवरून जाता-येता या साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी असहाय असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.

 

कचराच कचरा : सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर,  मुकुंदवाडीत सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत कचऱ्याची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधीने बुधवारी दुपारी फेरफटका मारला असता स्वच्छतामागे दडलेली अस्वच्छता समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

सुरेवाडी- जाधववाडीलगत मोंढा असल्याने मोकाट जनावरे तसेच टाकाऊ कचऱ्याची ढिगारे दर्शनी प्रवेश करताना निदर्शनात पडले. गल्लीबोळातील नागरिकांनी ठराविक ठिकाणीच कचरा टाकावा, अशा सूचना दिल्या असल्या तरी कचरा जाळण्याच्या धुराने कायम प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनात आले. 

आंबेडकरनगर परिसरात आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेवरच जळगाव रोडवर आरोग्य खराब करण्याचा प्रयत्न सुरू असून, कचऱ्याचा डोंगर आवारात दिसला, तर अंतर्गत वाहणाऱ्या गटारीत कचरा ढकलून दिल्याने दुर्गंधीत अधिक भर पडलेली दिसली. 

ब्रिजवाडीत मुख्य रस्त्यालगत झाडांच्या आड कचरा टाकला जात असून, काही ठिकाणी जाळला जातो तर उर्वरित कचरा नाल्यात टाकून दिल्याने मोकाट जनावरे अस्वच्छता पसरवीत आहेत. 

संजयनगरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारी तुडुंब भरल्या असून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भिंतीला कचराकुंडीचे स्वरूप देऊन ही कोणती स्वच्छता असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मुकुंदवाडीतील आरोग्य केंद्रासमोरच्या गटारीत कर्मचाऱ्यांनीच केरकचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली . मनपा शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकून अस्वच्छतेचे प्रदर्शन घडविले.  

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीगकचरामुक्त वॉर्ड झाल्याचा गवगवा करीत २ आॅक्टोबर रोजी पालिकेने सन्मान सोहळा उरकला असला तरी ५० टक्के वॉर्डांत कचऱ्याची समस्या अजून पूर्णपणे संपलेली नाही. वॉर्डातून उचललेला कचरा त्याच परिसरात कुठेतरी साचविला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. कचरा जाळणे, बॅगांमध्ये भरून रस्त्याच्या बाजूला ठेवणे, दुभाजकांत आणून टाकण्याचा प्रकार काही वॉर्डांत सुरूच आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका