शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ६० हजार हेक्टरने घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:07 IST

कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. मात्र, मागील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकरी यंदा कपाशीऐवजी मका किंवा अन्य कडधान्यांकडे वळण्याची शक्यता आहे. परिणामी, ४ लाख ३७ हजार हेक्टर कपाशीच्या सरासरी क्षेत्रापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्र कमी होऊ शकते.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. मात्र, मागील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकरी यंदा कपाशीऐवजी मका किंवा अन्य कडधान्यांकडे वळण्याची शक्यता आहे. परिणामी, ४ लाख ३७ हजार हेक्टर कपाशीच्या सरासरी क्षेत्रापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्र कमी होऊ शकते. त्यादृष्टीने कृषी विभागाने ३ लाख ७७ हजार हेक्टरवरच कपाशीचे क्षेत्र प्रस्तावित केले आहे.उल्लेखनीय म्हणजे, पैठण, गंगापूर, कन्नड व वैजापूर तालुक्यांतील काही भागात कापसाऐवजी यंदा उसाची लागवड होत असल्याचे विभागाच्या निदर्शनात आले आहे. शुक्रवारी वाल्मी येथे पालकमंत्री डॉ. प्रदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी खरीप हंगामपूर्व आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ३ हेक्टर आहे. मागील वर्षी यापैकी ६ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा २०१८-२०१९ या खरीप हंगामात ७ लाख २० हजार हेक्टर (१०० टक्के) पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मकाचे क्षेत्र १ लाख ९७ हजार हेक्टर व बाजरी ३९ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. तृणधान्य पिकांचे २ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, या पिकांपासून ७ लाख ७५ हजार ७२९ मेट्रिक टन इतके उत्पादन होण्याचा अंदाज पडवळ यांनी व्यक्त केला. जि.प. कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ मे रोजी ग्रामसभा तर २ मे रोजी तालुकास्तरावर किसान कल्याण दिवस आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे संपूर्ण खरीप हंगामात शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनासाठी व्यापक स्वरूपात अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या बैठकीत खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार, आ. संदीपान भुमरे, महापौैर नंदकुमार घोडेले, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह अधिकारी, शेतकरी हजर होते.सव्वा तासात बैठक आटोपलीजिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक वाल्मी येथे दुपारी दीड वाजता सुरू झाली व पावणेतीन वाजता संपली. या बैठकीत खासदार व आमदारच बोलले त्यांनीच प्रश्न मांडले. यावेळी आपले प्रश्न घेऊन अनेक शेतकरी आले होते; पण त्यांना बोलू दिले नाही. पालकमंत्र्यांना जाण्याची घाई असल्याने बैठक सव्वा तासात आटोपती घेण्यात आली.शेतकºयांच्या कर्जमाफीदारांची मराठी यादी देण्याचे आदेशछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने२२ंतर्गत १ लाख ७१ हजार ७२० शेतकºयांच्या कर्जमाफीची ६८९ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली. त्यातील १ लाख ४८ हजार १७० शेतकºयांच्या खात्यावर ४६८ कोटी १६ लाख रुपये वर्ग करण्यात आले. आता २४५५० शेतकºयांच्या खात्यावर २२१ कोटी ५७ लाख रक्कम वर्ग करणे शिल्लक असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या आकडेवारीवर सर्वप्रथम जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आ. अब्दुल सत्तार यांनी संपूर्ण यादी इंग्रजीमध्ये आहे अनेक शेतकºयांना कळत नाही. त्यासाठी तालुकानिहाय कर्ज माफ झालेल्या शेतकºयांची यादी, किती कर्ज माफ झाले त्याची आकडेवारी मराठीतून देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर सर्व आमदारांना त्यांच्या तालुक्यातील कर्जमाफीदारांची यादी मराठीतून देण्याचे आदेश डॉ. सावंत यांनी दिले.

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र