औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची राहत्या घरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:38 IST2019-02-25T18:02:34+5:302019-02-25T18:38:24+5:30

औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी आज दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचे ते वडील होते.

Aurangabad District Bank Chairman Suresh Patil committed suicide | औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची राहत्या घरी आत्महत्या

औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची राहत्या घरी आत्महत्या

औरंगाबाद -   जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे विद्यामान अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील (वय 78) यांनी आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूवी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी सदाशिव गायके आणि नाना पाटील हे जबाबदार असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरेश पाटील यांनी 2004 पासून त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भुषवले. विविध पक्षातील विविध जाती-धर्माचे 21 संचालकांना बिनविरोध निवडून आणत ही बँक यशस्वीरित्या सांभाळली.  आज दुपारी घरी असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यानी हे टोकाचे पाऊल उचलले. ही बाब कळताच त्यांना तात्काळ समर्थनगरातील साई रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योती मालवली होती. 40 ते 45 वर्षांपासून ते संचालक होते. यापैकी 26 ते 27 वर्षे त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भुषवले.

अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्यामुळे सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे संचालक बिनविरोध निवडून आले होते. 110 कोटीची तोट्यात असलेली ही बँक त्यांनी नफ्यात आणली. 11(1) कलम बँकला लागणार होती. बँक डबघाईस येणार होती. अशा बँकेचे त्यांनी पुनर्जीवन केले. कन्नडेच माजी आमदार नितीन पाटील यांचे ते वडील होते. अचानक झालेल्या या घटनेमूळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शोककळा पसरली आहे.

Web Title: Aurangabad District Bank Chairman Suresh Patil committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.