शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टँकरच्या ६१९ खेपांनी ग्रामीण भागाला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 6:15 PM

पुढील काही महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा सामना जिल्ह्यातील ग्रामीण भागाला करावा लागणार आहे.

ठळक मुद्देसाडेपाच लाख नागरिकांची वणवण  पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांची परिस्थिती गंभीर २४३ गावांना टँकरशिवाय पर्याय नाही

औरंगाबाद : जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती हळूहळू गंभीर वळणावर जात आहे. ६१९ टँकरच्या खेपा ग्रामीण भागातील तहानलेल्या गावांसाठी सध्या सुरू असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांची परिस्थिती गंभीर वळणावर असून, पुढील काही महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा सामना जिल्ह्यातील ग्रामीण भागाला करावा लागणार आहे. ८ वाड्यांसह २४३ गावांतील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना दुसरा पर्याय सध्या नाही. 

३०० च्या आसपास टँकरचा आकडा पोहोचला असून, २९८ खाजगी टँकरमार्फत हा पाणीपुरवठा सुरू आहे. १३४ विहिरींचे अधिग्रहण केल्याचे विभागीय प्रशासनाने म्हटले आहे. पैठणमधील ५० गावे, गंगापूरमधील ८२ गावे आणि वैजापूर, सिल्लोडमधील अनुक्रमे ४०, ३३ गावे टँकरच्या पाण्यावर अवंलबून आहेत. हिवाळ्यामध्ये ३०० टँकरने पाणीपुरवठा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१२ च्या तुलनेत यंदा पाणीपुरवठ्याची परिस्थिती बिकट असेल त्याचे हे द्योतक आहे. 

४१३ खेपा तीन तालुक्यांतपैठण तालुक्यात ११६ खेपा, गंगापूरमध्ये १८०, तर वैजापूर तालुक्यात ११७ खेपांनी टँकरचे पाणी ग्रामीण भागातील नागरिकांना पुरविले जात आहे. या तिन्ही तालुक्यांत ४१३ खेपा होत आहेत. १३४ विहिरींचे अधिग्रहण पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने केले आहे. त्यातील ११४ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 

तालुका          लोकसंख्या          टँकरऔरंगाबाद    ५१ हजार ५४६         २९फु लंब्री         २१ हजार ५५०         १०पैठण           १ लाख १२ हजार     ५६गंगापूर        १ लाख ५८ हजार     ९१वैजापूर       ७४ हजार ३९४          ५७खुलताबाद    ४ हजार ५००          ०१कन्नड        १७ हजार २९३         ०८सिल्लोड     १ लाख २६ हजार     ४७सोयगाव     ००    ००एकूण         ५ लाख ६५ हजार    २९९ 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद