लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : बहुभाषिक ब्राह्मणांची एकी, भक्ती, शिस्तीची अनुभूती भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत आली. बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवतींच्या ७ ढोलपथकांनी तर शहर दणाणून सोडले. मागील पाच वर्षांतील गर्दीचे विक्रम या शोभायात्रेने मोडीत काढले. एक लक्षवेधी, नियोजनबद्ध शोभायात्रा, पाहण्यात आल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.ब्राह्मण समाज समन्वय समितीअंतर्गत भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने राजाबाजार येथून शोभायात्रा काढण्यात आली. ‘विष्णू के छठे अवतार परशुराम की जयजयकार’ अशा गगनभेदी जयघोषाने वातावरण दुमदुमले होते. तरुणाईचा जोश, जल्लोष कसा असतो ते आजच्या शोभायात्रेत अनेकांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. ब्रह्मगर्जना या ढोलपथकाने नावाप्रमाणेच जोरदार ढोलवादन करून भगवान परशुरामाचा गजर केला. पोपटी रंगाचा कुर्ता, पांढरा पायजामा व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ‘जय परशुराम’ असे लिहिलेल्या टोप्या, असा गणवेश या ढोलपथकाचा होता. चॉकलेटी रंगाचा कुर्ता व पांढरा फेटा बांधलेले १८० युवक-युवतींच्या ‘ब्रह्मनाद’ या जम्बो ढोलपथकाने ‘एकही नारा, जय श्रीराम’ अशी गर्जना करीत तुफान ढोलवादन करून सर्वांना थकीत केले, तसेच सोनेरी कुर्ता व लाल धोतर परिधान केलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ ढोलपथकानेही ढोलवादनासोबत लाठी, तलवारबाजीचे थरारक प्रात्यक्षिक दाखवून सर्वांची दाद मिळविली.
औरंगाबादेत ब्रह्मवृंदांची भक्ती, एकी, शिस्तीची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:40 IST
बहुभाषिक ब्राह्मणांची एकी, भक्ती, शिस्तीची अनुभूती भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत आली. बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवतींच्या ७ ढोलपथकांनी तर शहर दणाणून सोडले. मागील पाच वर्षांतील गर्दीचे विक्रम या शोभायात्रेने मोडीत काढले. एक लक्षवेधी, नियोजनबद्ध शोभायात्रा, पाहण्यात आल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
औरंगाबादेत ब्रह्मवृंदांची भक्ती, एकी, शिस्तीची अनुभूती
ठळक मुद्देढोलपथकाचा दणदणाट : भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा लक्षवेधी; पाच तास चालला जल्लोष