शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आता पाच मिनिटांत पोलीस ‘ऑन द स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:06 IST

शहर पोलीस झाले अधिक सतर्क 

ठळक मुद्दे जीपीआरएसमुळे वाहनाचे लोकेशन दिसतेकंट्रोल रूम देते तत्काळ सूचना

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : डिजिटलायजेशनच्या सुविधेमुळे शहर अधिक सुरक्षित झाले असून, आता अवघ्या पाच मिनिटांत शहरातील कोणत्याही भागात पोलिसांची मदत पोहोचणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिसांची कार्यक्षमता व कामगिरीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. फूड, टॅक्सीसेवा अशा काही खाजगी सेवा जीपीआरएस लोकेशन या सेवेच्या माध्यमातून शहरात कार्यरत आहेत. याच सेवेचा धागा पकडत स्मार्ट सिटीत गुन्हेगारीवर लक्ष ठेवून शहरातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिले जात आहे. 

शांततेत पार पडलेले विविध उत्सव, निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या वेळी पोलिसांची सतर्कता दिसून आली. संरक्षणाच्या बाबतीत गाफील राहता कामा नये, रस्त्यावरील सोनसाखळी, चोऱ्यामाऱ्या तसेच रस्त्यावरील गुन्ह्यांची पोलीस कंट्रोल रूमला माहिती मिळाली की, प्रामुख्याने तांत्रिक विभागाच्या माध्यमातून ठराविक स्थळापासून कोणते वाहन किती अंतरावर आहे. घटनास्थळी कोण तात्काळ जाईल, याचे मॅप लोकेशन घेऊन तात्काळ त्या वाहनाला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. दिवसभरातून येणाऱ्या कॉलवर कंट्रोल विभाग आता आधुनिकीकरणातून लक्ष ठेवण्याचे काम करीत आहे. ठाण्याच्या हद्दीत लक्ष शहरात १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वन मोबाईल, टू मोबाईल वाहन आदी ३४ गाड्या, तसेच मोटारसायकली ३७ आणि इतर गस्तीच्या १० गाड्या सतत रस्त्यावर गस्तीवर असतात. शहरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनेत तात्काळ मदत देण्यासाठी यंत्रणा कार्यरत झालेली आहे. त्यावर आयुक्तालयातील कंट्रोल विभागातून विशेष लक्ष ठेवून आहेत. कोणते वाहन कुठे थांबले की, गस्तीवर याचा अंदाज पोलीस यंत्रणेला क्षणात घेणे शक्य झाले आहे. 

डिजिटलायजेशनचा फायदावाहनाला नवीन ३० कॅमेरे लावण्यासाठी मंजुरी दिली आहे. जीपीआरएसच्या माध्यमातूनही एका क्लिकवर रस्ते व विविध स्पॉटवर खाजगी २,७०० च्या जवळपास कॅमेऱ्यांची मदत मिळत आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या सूचनेनुसार घटनास्थळावर गस्ती वाहन पोलिसांसह अवघ्या पाच मिनिटांत पाठवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे गुन्हेगारांना चपराक बसण्यासाठी मोठी मदत झाली आहे. शहरातून फिरणाऱ्या गस्ती पथकांवरदेखील जीपीआरएसच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. क्राईमच्या घटना रोखण्यास मदत होत आहे. -डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdigitalडिजिटल