शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबाद : ‘समांतर’च्या बैठकीवर भाजपने फेरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:34 IST

समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले.

ठळक मुद्देआंदोलनाचे वादंग : तातडीने अपुऱ्या पाणीपुरवठ्यासाठी बैठक

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेतील ‘समांतर’ची बैठक सोडून महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त नवल किशोर राम तसेच पदाधिकारी व अधिकाºयांना एन- ५ कडे धाव घ्यावी लागली.

पाणीटंचाईचा मुद्दा पुढे करत भाजप, काँग्रेस आणि इतर नगरसेवकांनी सिडको-हडको आणि जालना रोडच्या पलीकडील अनेक वॉर्डांना पाणीच येत नसल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, बापू घडामोडे, माधुरी अदवंत , काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, सोहेल शेख आदींसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महपौर घोडेले आणि नवल किशोर राम यांनी तातडीने महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजित करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर महापालिकेत नगरसेवकांसमवेत पदाधिकारी व अधिकारी अशी बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही पाणीप्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपने ‘समांतर’च्या बैठकीवर आंदोलनाच्या माध्यमाने पाणी फेरल्याची चर्चा महापालिकेत होती.

जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी आणण्याचे काम औरंगाबाद वॉटर युटिलिटीला परत देता येऊ शकते का, याची चाचपणी राज्य शासन, मनपाकडून सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी एक बैठकही घेण्यात आली. या बैठकीस भाजप, सेना, एमआयएम आमदार उपस्थित होते. यानंतर कंपनीच्या अधिकाºयांनी महापौर नंदकुमार घोडेले यांचीही भेट घेतली. त्यांनी सोमवार ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता मनपात कंपनीच्या अधिकाºयांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘समांतर जलवाहिनीवरून जोरदार राजकारण सुरू असून त्याचा प्रत्यय सोमवारीही आला.

चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीस्थायी समितीच्या सभागृहात आंदोलक नगरसेवकांसमवेत दुपारी १ वाजता बैठकीला सुरुवात झाली. यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांचीही उपस्थिती होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचे दु:ख मांडत कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. महापौर घोडेले यांनी त्यांना विचारणा केली की, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत. यावर चहल यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. शेवटी प्रभारी आयुक्तांनी नमूद केले की, आज सायंकाळी ६ वाजता मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

‘सर्व वॉर्डांत तीन दिवसांआड पाणी द्या’शहरातील अनेक वॉर्डांना पाच आणि सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सोमवारी सकाळी झाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश दिले. उद्या, मंगळवारपासूनच याची अंमलबजावणी करावी, असेही आदेशही त्यांनी दिले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी त्वरित अंमलबजावणीस होकारही दर्शविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सर्व पाणीपुरवठ्याचे अधिकारी एकत्र बसून नियोजन करणार आहेत. शहरातील ५० वॉर्डांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उर्वरित वॉर्डांना तीन, चार आणि पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. नियोजन करून उन्हाळ्यात तीन दिवसांआड पाणी देण्यात येणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाagitationआंदोलनMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर राम