शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

औरंगाबाद कृषी विभागात हरभर्‍याचे क्षेत्र वाढले मात्र दर गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 5:31 PM

औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्दे ३० टक्के आयात शुल्क वाढूनही मंदीचबळीराजाच्या अडचणीत आणखी भर 

औरंगाबाद : मागील वर्षी हरभरा व हरभरा डाळीला उच्चांकी भाव मिळाला होता. यामुळे  यंदा शेतकर्‍यांनी रबी हंगामात ज्वारी, गव्हावरील लक्ष कमी करून १८६.४२ टक्के हरभर्‍याची पेरणी केली. मात्र, नवीन हरभरा हाती येण्यास आणखी दोन महिन्याचा अवधी बाकी असताना बाजारात मात्र, आतापासूनच हरभरा डाळीचे भाव गडगडण्यास सुरुवात झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे मार्चपर्यंत शेतकर्‍यांच्या हाती हरभरा पीक येईपर्यंत योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने ३० टक्के आयात शुल्क लावले. मात्र, भाव वाढण्यापेक्षा कमी झाले. 

औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्हा मागे आहे. कृषी अधिकार्‍यांच्या मते ८५-८८ टक्क्यांपर्यंतच औरंगाबाद जिल्ह्यात रबीची पेरणी पूर्ण होईल. यंदा तिन्ही जिल्ह्यांतील शेतकर्‍यांनी गहू,ज्वारीऐवजी हरभरा पिकाला अधिक प्राधान्य दिले. कारण हरभर्‍याला एक ते दोन पाण्याच्या पाळ्या दिला तरी पीक चांगले येते. रोग पडण्याचा धोकाही कमी असतो. यामुळेच जिथे सरासरी १ लाख १७ हजार ४२८ हेक्टरवर हरभर्‍याचे पीक घेतल्या जात तेथे आजमितीपर्यंत २ लाख १८ हजार ९१५ हेक्टरवर हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच तब्बल १८६.४२ टक्के आजपर्यंतची सर्वाधिक पेरणीची नोंद झाली आहे. डाळीचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, मागील वर्षी आॅगस्ट २०१६ दरम्यान हरभरा डाळ ९००० ते ९५०० रुपये तर हरभरा ७००० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला होता.

यामुळे शेतकर्‍यांनी हरभर्‍याच्या पेरणीकडे आपले लक्ष केंद्रित केले. अशीच परिस्थिती देशभरातील आहे. यामुळे  पुढील वर्षी हरभराचे बंपर उत्पादन होणार हे आता निश्चित झाले आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने २१ डिसेंबर रोजी ३० टक्के आयात शुल्क वाढवून टाकले. पण याचा क्षणिक परिणाम जाणवला, पण पुन्हा क्विंटलमागे १ हजार रुपयांनी भाव गडगडले. सध्या हरभरा ३८०० ते ४१५० रुपये तर हरभरा  डाळ ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हरभरा व डाळीचे भाव निम्मेच झाले आहेत.  यंदा नवीन हरभरा येण्याआधीच भाव गडगडल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. 

सात राज्यांत हरभरा पीक देशात महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या सात राज्यांत मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतल्या जाते. दरवर्षी सुमारे ६५ लाख टन हरभरा देशाभरात पिकविला जातो. तरीही हरभर्‍याची मागणी कायम असते. त्यामुळे दरवर्षी आॅस्ट्रेलिया आणि  टांझानिया येथून सुमारे २० लाख टन हरभरा भारतात आयात केला जातो. देशात हरभराचे बंपर उत्पादन होणार हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयातीवर ३० टक्के शुल्क लावले आहे. सरकारने हरभर्‍याला ४४०० रुपये प्रतिक्विंटल किमान मूल्य दर (एमएसपी) काढला आहे; पण बाजारात हरभर्‍याचे भाव ३८०० रुपयांपर्यंत खाली येऊन ठेपले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादBeedबीडJalanaजालना