औरंगाबाद @ ८२९ ; आणखी सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 14:41 IST2020-05-15T14:41:33+5:302020-05-15T14:41:54+5:30
शुकवारी दुपारपर्यंत ८० रुग्णांची भर

औरंगाबाद @ ८२९ ; आणखी सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहरात सकाळच्या सत्रात ७४ कोरोना बाधितांची वाढ झाली, तर दुपारी आणखी ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८२९ झाला आहे.
शुक्रवारी दुपारी सिल्कमिल कॉलनी 1, चाऊस कॉलनी 2 आणि हुसेन कॉलनी 3 या भागातील सहा रुग्ण आणखी वाढले आहेत. तर सकाळी सिडको एन ६ मध्ये २, बुढीलेन १, रोशन गेट १, संजय नगर १, सादात नगर १, भीमनगर भावसिंगपुरा २, वसुंधरा कॉलनी १, वृंदावन कॉलनी ३, न्याय नगर ७, कैलास नगर १, पुंडलिक नगर ८, सिल्क मील कॉलनी ६, हिमायत नगर ५, चाऊस कॉलनी १, भवानीनगर ४, हुसेन कॉलनी १५, प्रकाश नगर १, शिव कॉलनी गल्ली नं. ५ पुंडलिक नगर १, हुसेन कॉलनी गल्ली नं.५ मध्ये २, रहेमानिया कॉलनी २, बायजीपुरा ५, हनुमान नगर १, हुसेन नगर १, अमर सोसायटी १, न्यू हनुमान नगर, गल्ली नं.१ दुर्गा माता मंदिर परिसरात १ या भागातील ७४ कोरोनाबाधितांची वाढ झाली होती.