‘ऑरा ऑफ ऑरिक’; औरंगाबादेत देशविदेशातील राजदूत दाखल, एफडीआय, पर्यटन संधीवर मंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 01:35 PM2022-03-26T13:35:16+5:302022-03-26T13:38:05+5:30

या परिषदेमुळे ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक व्हेईकल, इलेक्ट्रॉनिक्स, फुड प्रोसेसिंग तसेच टेक्सटाईल्स या क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळणार आहे.

‘Aura of Auric’; Ambassadors from home and abroad arrive in Aurangabad | ‘ऑरा ऑफ ऑरिक’; औरंगाबादेत देशविदेशातील राजदूत दाखल, एफडीआय, पर्यटन संधीवर मंथन

‘ऑरा ऑफ ऑरिक’; औरंगाबादेत देशविदेशातील राजदूत दाखल, एफडीआय, पर्यटन संधीवर मंथन

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात औद्योगिक व पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. त्या दृष्टीकोनातून औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक व्हावी, जागतिक पातळीवर पर्यटन राजधानीची चर्चा व्हावी, या उद्देशाने शनिवार, दि. २६ मार्च रोजी ‘ऑरा ऑफ ऑरिक’ या विदेशी गुंतवणूक व पर्यटन संधीबाबतच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच दहा देशांचे राजदूत सहभागी होणार आहेत.

डीएमआयसीच्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) अंतर्गत शेंद्रा व बिडकीन परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या परिषदेमुळे ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक व्हेईकल, इलेक्ट्रॉनिक्स, फुड प्रोसेसिंग तसेच टेक्सटाईल्स या क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळणार आहे. शनिवारी सकाळी शेंद्रा ऑरिकमध्ये ही परिषद होईल. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, एआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. रंगा नायक, एमआयसीडीसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एआयटीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते, रशियन विकास परिषदेचे सदस्य अलेक्झांडर प्रेमिनोव, यूएसआयएसपीएफच्या संचालक सुरभी वहाळ, तैवान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जेनिफर मखेचा, जेट्रोचे महासंचालक मुनेनोरी मस्तुंगा, वाणिज्य आयुक्त स्वीस बिझनेस हब विजय अय्यर आदी विविध देशांतील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वाणिज्य राजदुतांची उपस्थिती
या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी सिंगापूरचे राजदूत चिआँग मिंग फूंग, उपराजदूत झाक्यअस लिम, स्वीडनचे राजदूत ऐना लेकवाल, जर्मनीचे राजदूत मरजा सिरक्का इनिंग, कोरियाचे राजदूत योंग ओग किम, इस्त्राईलचे राजदूत कोबी शोशानी, नेदरलँडचे राजदूत अल्बट्र्स विल्हेल्मस डी जोंग, रशियाचे राजदूत अलेक्सी सुरोवत्सेव, उपराजदूत गोओर्गी द्रेअर हे शुक्रवारी सायंकाळी शहरात दाखल झाले.

Web Title: ‘Aura of Auric’; Ambassadors from home and abroad arrive in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.