परतूर तालुक्यात मृगाची हजेरी
By Admin | Updated: June 22, 2014 00:10 IST2014-06-21T23:28:25+5:302014-06-22T00:10:06+5:30
परतूर :तालुक्यात मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसात तालुक्यात पावसाची सरासरी २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परतूर तालुक्यात मृगाची हजेरी
परतूर :तालुक्यात मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसात तालुक्यात पावसाची सरासरी २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पावसाची नोंद आष्टी सर्कलमध्ये झाली आहे.
७ जूननंतर पावसाळा सुरू होतो. मात्र, २० जून उलटत आला तरी मोठा पाऊस पडलेला नाही. उन्हाचा कडाका, पाऊस कमी पडणार, लांबणार याची चर्चा सुरु आहे. शेतकरीवर्ग यंदा चांगलाच धास्तावलेला आहे. दि. २० रोजी रात्री आठच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस तालुक्यात सर्वत्र असल्याने शेतकऱ्यांना पेरणी व पेरणीपूर्व मशागतीसाठी अत्यंत लाभदायक ठरला आहे. तालुक्यात परतूर २९ , वाटूर १३, आष्टी ४९ , सातोना २९ श्रीष्टी १९ मिलीमीटर पाऊस झाला. सर्कलनिहाय एकूण सरासरी २७. ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असल्या तरी पेरणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी बोलत आहेत. दरम्यान, या झालेल्या पावसाने वाढलेल्या उकाड्यातूनही नागरिकांची सुटका झाली आहे. मोठ्या पावसाची नितांत गरज आहे.
(वार्ताहर)
आष्टीत ४९ मि.मी.
तालुक्यातील आष्टी सर्कलमध्ये ४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकरी पेरणीकडे वळले असून, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.