अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:37 IST2019-05-11T23:37:07+5:302019-05-11T23:37:18+5:30
शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिन्सी पोलिसांनी पुणे येथून पकडून आणले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
औरंगाबाद : शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिन्सी पोलिसांनी पुणे येथून पकडून आणले. पीडितेच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविला.
फैसल खान असे आरोपीचे नाव आहे. फैसलने त्याच्या ओळखीच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २७ एप्रिल रोजी राहत्या घरातून पळवून नेले होते. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि कर्मचाऱ्यांनी तपास केला तेव्हा आरोपी आणि पीडिता हे पुणे येथे असल्याचे त्यांना समजले.
यानंतर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला पकडले आणि त्याच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदविला असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी आणि बाललैंगिक अत्याचार, बलात्काराचे कलम वाढवून या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दिली.