जिल्हा परिषद कार्यालयात बडतर्फ शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 13:32 IST2019-03-06T13:17:20+5:302019-03-06T13:32:23+5:30

त्यांना उपचारासाठी पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Attempting to commit suicide by a teacher in Zilla Parishad office | जिल्हा परिषद कार्यालयात बडतर्फ शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हा परिषद कार्यालयात बडतर्फ शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : शाळेतून काढलेल्या शिक्षकाने शाळेची चौकशी करण्याची मागणी करूनही शिक्षण विभागाने टाळाटाळ केल्यामुळे पटेल मुकिम  मेहबूब या शिक्षकाने बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

पटेल मुकिम  मेहबूब यांनी शाळेच्या चौकशीत शिक्षण विभाग टाळाटाळ करत असल्याने प्रशासनाला यापुर्वीच निवेदनाद्वारे आत्महत्येचा इशारा दिला होता. यामुळे या ठिकाणी आधीच पोलिस येवुन थांबले होते, मात्र रिक्षात बसून आलेले मुकिम पटेल यांनी पोलिसांना गुंगारा देऊन विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना उपचारासाठी पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Attempting to commit suicide by a teacher in Zilla Parishad office