कुंभेफळमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:53 IST2018-12-24T21:52:37+5:302018-12-24T21:53:01+5:30
औरंगाबाद-जालना महामार्गावरील कुंभेफळ येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापून फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

कुंभेफळमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न
करमाड : औरंगाबाद-जालना महामार्गावरील कुंभेफळ येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापून फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु एटीएममधील पैसे काढण्यात चोरटे यशस्वी झाले नाही. ही घटना २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली.
एसबीआय बँकेचे कुंभेफळ औरंगाबाद-जालना मार्गावर एमआयडीसी समोर एटीएम आहे. २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन कापली. परंतु चोरते पैसे काढण्यात यश आले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता कॅमेऱ्यात एक चोरटा दिसून आला. बँक व्यवस्थापक विक्रमसिंग यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.