हल्ल्याने पुरोगामी विचार संपणार नाही़़
By Admin | Updated: February 22, 2015 00:37 IST2015-02-22T00:35:50+5:302015-02-22T00:37:58+5:30
लातूर : ‘ सवाल ये नही की शीशा कैसे टुटा, सवाल ये है की पत्थर कहाँ से छुटा’ असा जळजळीत सवाल करून कॉ़ गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व संताप व्यक्त करीत

हल्ल्याने पुरोगामी विचार संपणार नाही़़
लातूर : ‘ सवाल ये नही की शीशा कैसे टुटा, सवाल ये है की पत्थर कहाँ से छुटा’ असा जळजळीत सवाल करून कॉ़ गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व संताप व्यक्त करीत लातुरातील कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली़ मान्यवरांनी श्रध्दांजली देतानाच पुरोगामी विचारांवरील हे हल्ले विचार संपवू शकणार नाहीत़ यामुळे उलट पुरोगामी विचारांची धार वाढत राहील, असा खणखणीत ईशाराही दिला़४
अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज जिल्ह्यातील पुरोगामी संघटनांच्या कृती समितीने बंदमध्ये सहभागी होण्याची हाक दिली आहे. भारतीय कम्युनिष्ठ पक्षाने पुकारलेल्या या बंदला राज्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठींबा दिला आहे. या बंदमध्ये सहभागी होऊन पुरोगामी विचारांवरील हल्ल्याचा लातुरकरांनी निषेध करावा, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहर गोमारे, अॅड. उदय गवारे, रामकुमार रायवाडीकर आणि कॉ, विठ्ठल मोरे आदींनी केले आहे. शिवाय कृती समितीच्या वतीने सायंकाळी पाच वाजता टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन केले आहे.
४लातूर बंदला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला असून पक्ष कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड़ व्यंकट बेद्रे यांनी दिली़
अखेर गोविंद पानसरे हे नरेंद्र दाभोळकर यांच्याप्रमाणे आपल्याला सोडून गेले. पण विचार ठेवून गेले आहेत. केवळ पुरोगामी विचार मांडल्यानेच त्यांच्यावर हल्ला झाला, परंतु पुरोगामी विचार संपणार नाही, कारण ‘सत्य परेशान हो सकता, पराजित नही.’ असंख्य पाय असलेल्या गोमीचा एक पाय निकामी झाल्याने गोम चालायची थांबत नाही, हे ध्यानात घ्यावे. पुरोगामी चळवळ आणि विचार आपल्या इतर पायांवर बुलंद राहील. तो बुलंद करण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागणे हीच खरी पानसरेंना श्रध्दांजली आहे. -अॅड. अण्णाराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र विकास आघाडी
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावरील हल्ला अशाच पध्दतीने पचविला गेला. ना आरोपीचा मागमूस लागला ना खुन्याची माहिती. त्याचीच पुनरावृत्ती आता अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याने होत आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे घरा-घरात दाभोळकर आणि घरा-घरात पानसरे तयार होतील. गांधी मेले पण, गांधीजींचा विचार आज जगात गौरविला जातो. अशा शक्तींना कुणीही भीक घालणार नाही. कार्यकर्त्यांनी आपला विचार आता नव्याने पुढे येऊन मांडण्याची गरज आहे़ - प्रा़ माधव बावगे, अंनिस, लातूर
या देशात सर्वांत पुरोगामीवाद्यांकडी प्रतिगामी लोकांना भीती वाटत असल्याने पुरोगामी विचारांचा अंत करण्यासाठीच काही लोक आता जिवावर उठले आहेत़ त्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे़ सध्या ‘हिंदूत्ववादी’ परिवार आणि ‘संविधान परिवार’ हे दोन गट देशात निर्माण झाले आहेत़ धर्मांध शक्तीच्या विरोधात आता सर्व संविधानवादी विचार माणणाऱ्यांनी एक विचार ठेवून एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे़ असे हल्ले होत आहेत़ विशेष म्हणजे अशा घटनांना सरकारही पाठीशी घालताना दिसते आहे. याला आता सर्व जनमाणसांतून विरोध व्हायला हवा. -अॅड. उदय गवारे, शेकाप, लातूर