माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:35 IST2020-03-02T12:33:08+5:302020-03-02T12:35:08+5:30
भूखंडाशेजारी टपरी उभारल्याने वाद

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल
औरंगाबाद: भूखंडाशेजारी टपरी लावल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून माजी आमदार तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध ॲट्रासिटी कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा भाग्यनगर येथे भूखंड आहे. याच्या शेजारी नितीन दाभाडे यांनी टपरी उभारली होती. टपरी लावल्याच्या कारणावरून जाधव यांनी २९ फेब्रुवारीस तांगडे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रांती चौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.