एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार पुढील वर्गात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 18:41 IST2020-07-31T18:39:41+5:302020-07-31T18:41:10+5:30

अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

ATKT students will also get admission in the next class | एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार पुढील वर्गात प्रवेश

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार पुढील वर्गात प्रवेश

ठळक मुद्देशासन आदेश प्राप्त झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी वर्गाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. मागील सत्रात एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

शासन निर्णय आल्यानंतर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे. मागील सत्र पूर्णपणे उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी गुरुवारी परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला. 

अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल तूर्तास राखीव राहणार आहे. शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मात्र, मागील सत्रात अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा. शासन निर्णयानुसार ते बंधनकारक आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

Web Title: ATKT students will also get admission in the next class