शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

असोसिएट सीईटी रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना होणार फायदा

By admin | Updated: March 13, 2016 14:49 IST

परभणी : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षेसाठी यापूर्वी होणारी असोसिएट सीईटी ही परीक्षा रद्द करुन एकच वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला

परभणी : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षेसाठी यापूर्वी होणारी असोसिएट सीईटी ही परीक्षा रद्द करुन एकच वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असून या निर्णयाचा राज्यातील गोरगरीब आणि मागासवर्गीय विभागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी यापूर्वी शिक्षण विभागाच्या वतीने सीईटी परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर खाजगी आणि विना अनुदानित महाविद्यालयामधील वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी असोसिएट सीईटी घेण्यात येत होती. सुमारे ६०० जागा असोसिएट सीईटीमार्फत भरल्या जात. यात विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसाही वाया जात होता. या निर्णयात शासनाने बदल केला असून एकाच सीईटीमार्फत सर्व महाविद्यालयातील वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश गुणवत्ता यादीनुसार होणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा राज्यभरातील गोरगरीब विद्यार्थ्यांबरोबरच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती डॉ.हुलसुरे फाऊंडेशनचे डॉ.मारोती हुलसुरे यांनी दिली. १ मार्चपासून आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ती २२ मार्चपर्यंत चालणार आहे. ६६६.ेिी१.ङ्म१ॅ. या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत. २५ ते ३० एप्रिल या काळात अ‍ॅडमिट कार्ड मिळणार आहे. (प्रतिनिधी)अशी असेल परीक्षा पद्धतयावर्षी प्रथमच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी एकच सीईटी परीक्षा ७ मे रोजी होत आहे. या परीक्षेविषयी येथील डॉ.मारोती हुलसुरे यांनी सांगितले, यावर्षी सीईटी परीक्षा बारावी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होणार आहे. दीडशे गुणांची ही परीक्षा असेल. त्यात भौतिकशास्त्र ५०, रसायनशास्त्र ५० आणि जीवशास्त्र १०० गुणांचे पेपर असतील. तर अभियांत्रिकीसाठी भौतिक, रसायन प्रत्येकी ५० गुण आणि गणिताचे १०० असे १५० गुणांसाठी ही परीक्षा होईल. यावर्षी परीक्षेचे वैशिष्ट्ये म्हणजे या वैद्यकीय सीईटी परीक्षेतून शासकीय म्युन्सिपल कार्पोरेशन, प्रायेव्हेट एडेड, अनएडेड आणि मायनॉरिटी हेल्थ सायन्स इन्स्टिट्युशन, कॉलेज यासाठी ही परीक्षा बंधनकारक राहणार आहे. तसेच याच परीक्षेच्या गुणवत्ता यादीतून व्हेटरनरी सायन्स आणि अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड फिशरी या अभ्यासक्रमासाठीही प्रवेश दिले जाणार आहेत.