सहाय्यक पोलिस निरीक्षकाला पकडले

By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-06T00:06:19+5:302014-10-06T00:13:22+5:30

नांदेड: शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पिसे यांना एका प्रकरणात ७० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ठाण्यातच सापळा रचून पकडले़

Assistant Police Inspector was arrested | सहाय्यक पोलिस निरीक्षकाला पकडले

सहाय्यक पोलिस निरीक्षकाला पकडले

नांदेड: शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पिसे यांना एका प्रकरणात ७० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ठाण्यातच सापळा रचून पकडले़ याप्रकरणी पिसे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
एका तक्रारदाराविरुद्ध असलेला अर्ज निकाली काढण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती़ तक्रारदार यांनी मात्र पैसे दिले नाही़ त्यानंतर पिसे यांनी त्यांची इंडीका कार जप्त करुन ठाण्यात आणून लावली़ पैसे दिल्याशिवाय कार सोडणार नाही असा दमही तक्रारदाराला दिला़ याप्रकरणी ५ आॅक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रविवारी विमानतळ पोलिस ठाण्यातच सापळा रचला़ यावेळी तक्रारदाराचा अर्ज निकाली काढून इंडीका कार परत देण्यासाठी पिसे यांना ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले़ याप्रकरणी पिसे यांच्याविरोधात त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ याप्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक संजय कुलकर्णी करीत आहेत़ या कारवाईत पोलिस अधीक्षक एस़ एल़ सरदेशपांडे, उपअधीक्षक एम़ जी़ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक भिमराव श्ािंगाडे, अशोक देशमुख, सय्यद साजीद, दत्तात्रय वडजे, बाबू गाजुलवार, मारोती केसगीर, शेख चाँद, शेख इकबाल, पोकॉ़शेख अनवर यांनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)

Web Title: Assistant Police Inspector was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.