शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी, मोहर्रमला छत्रपती संभाजीनगरात निर्जळी; जलवाहिनी फुटल्याने २६ तास पाणीपुरवठा बंद

By मुजीब देवणीकर | Updated: July 18, 2024 14:14 IST

ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणारी १२०० मिमीची जलवाहिनी मंगळवारी सकाळी ८ वाजता ढोरकीन येथे फुटली. जलवाहिनीची दोन वेळेस दुरुस्ती, त्यानंतर जायकवाडीच्या विद्युत पॅनलमधील बिघाड दूर करण्यासाठी मनपाला तब्बल २६ तास लागले. शहरात एक थेंबही पाणी न आल्याने जलकुंभ कोरडे पडले. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. अनेक नागरिकांना वापरण्यासाठी खासगी टँकर, पिण्यासाठी जार आणावे लागले. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत तीन जलवाहिन्या आहेत. सर्वांत मोठी जलवाहिनी म्हणजे १२०० मिमी व्यासाची होय. याच जलवाहिनीने मंगळवारी सकाळी ढोरकीन गावाजवळ दगा दिला. दुपारी अडीच वाजेपर्यंत मनपाने दुरुस्तीचे काम पूर्णही केले होते. तपासणीत काही प्रमाणात गळती राहिल्याचे लक्षात आले. मग परत दुरुस्तीला सुरुवात करावी लागली. ज्या ठिकाणी दुरुस्ती करायची होती, तेथील जलवाहिनीचा पत्रा बराच नाजूक झालेला होता. मध्यरात्री दोन वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. पंप सुरू करण्यास जायकवाडीत सांगण्यात आले. तेथील विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. दुरुस्तीची कामे यांत्रिकी विभागाने केली. सकाळी १०:३० वाजता जायकवाडीतील उपसा पंप सुरू करण्यात आले. दुपारी एक वाजेनंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. शहराचा पाणीपुरवठा जवळपास २६ तास बंद होता.

आषाढी आणि मोहर्रमबुधवारी शहरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी उपवास ठेवले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम बहुल भागात मोहर्रमनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. खासगी टँकर आणि पाण्याचे जार मागवून तहान भागवावी लागली.

दुपारनंतर टप्पे सुरूशहरात पाणी येण्यास सुरुवात झाल्यावर दुपारी ३ ते ४ वाजेनंतर शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू करण्यात आले. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना बुधवारी प्राधान्याने पाणी देण्यात आले. बुधवारी ज्या वसाहतींना पाणी देण्याचा दिवस होता, त्यांना गुरुवारी पाणी मिळेल, असे मनपाकडून सांगण्यात आले.

काही वसाहतींना कमी दाबाने पाणी१२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद असताना जुन्या शहराची ७०० मिमी आणि नव्याने टाकलेली ९०० मिमीची जलवाहिनी सुरू होती. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे शहरात ३० ते ३५ एमएलडी पाणी येत होते. काही वसाहतींना अत्यंत कमी दाबाने पाणी देण्याचा प्रयत्न केल्याचे मनपाकडून कळविण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी