शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात झालेल्या कृत्रिम पावसाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:42 IST

मराठवाड्यात जून ते सप्टेंबर २०१५ या काळात करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जपानमध्ये झालेल्या एका परिषदेत त्या प्रयोगावर सादर करण्यात आलेला रिसर्च पेपर (शोधनिबंध) प्रकाशित झाला आहे.

ठळक मुद्देपुढच्या वर्षी हवामान खाते स्वत:चे विमान घेणारते कायमस्वरूपी तंत्रज्ञान राज्यभरात दुष्काळी भागात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी वापरण्यात येणार 

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यात जून ते सप्टेंबर २०१५ या काळात करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जपानमध्ये झालेल्या एका परिषदेत त्या प्रयोगावर सादर करण्यात आलेला रिसर्च पेपर (शोधनिबंध) प्रकाशित झाला आहे. त्या प्रयोगानंतर हवामान खाते पुढच्या वर्षी कृत्रिम पावसासाठी स्वत:चे विमान खरेदी करणार आहे. ते कायमस्वरूपी तंत्रज्ञान राज्यभरात दुष्काळी भागात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी वापरण्यात येणार आहे. 

रडारच्या साहाय्याने तयार करण्यात आलेला डाटा हवामान खात्याला देण्यात आला आहे. त्याचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर विमान खरेदी करण्याबाबत निर्णय झाला आहे. पुढच्या वर्षी त्याचा फायदा होईल. जून २०१८ मध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी शासनाची स्वत:ची यंत्रणा तयार असेल. सी-बॅण्ड डॉप्लर रडार, विमान व इतर साम्रगी शासन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. २७ कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग १४ दिवस करण्यात आला होता. १०० तासांवर १०० तास मोफत असा करार ख्याती वेदर मॉडिफिकेशन या कंपनीसोबत करण्यात आला होता.

११० तासांच्या आसपास विमानाने प्रयोग करून ९५० मि.मी.पर्यंत पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला होता. कराराच्या ५० टक्केच उड्डाण झाले होते, तरीही १३ कोटी ५० लाख रुपयांचा जास्तीचा खर्च कंपनीला द्यावा लागला होता. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. विमान पार्किंग, शास्त्रज्ञ, पायलटस्, तंत्रज्ञांचे आवास, निवास खर्चासह ते कंत्राट होते. ४ आॅगस्ट रोजी प्रयोगाला सुरुवात झाली होती.

फ्लेअर्स गेले कुठे...२०१५ आॅगस्टमध्ये ३४८, सप्टेंबरमध्ये २०१ असे ५४९ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले होते. ३ हजार फ्लेअर्सचा साठा करून ठेवण्यात आला होता. विमान गेल्यानंतर चिकलठाणा विमानतळावरील तो साठा कुठे गेला, याबाबत नायब तहसीलदार बी.डी. म्हस्के यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.तत्कालीन आपत्तीव्यवस्थापन संचालक तथा भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, फोडून शिल्लक राहिलेले फ्लेअर्स विमानासोबतच नेण्यात आले. त्यामुळे त्यांचा साठा शिल्लक राहिला नाही. 

जपानच्या परिषदेत शोधनिबंधजपानच्या एका परिषदेत तत्कालीन आपत्तीसंचालक सुहास दिवसे यांनी शोधनिबंध सादर केला. तो निबंध प्रकाशित झाला आहे. दिवसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर कृत्रिम पावसाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. चीनने या प्रयोगात मोठे यश मिळविले आहे. राज्य शासन पुढच्या वर्षात कृत्रिम पावसाची पूर्ण यंत्रणा खरेदी करण्याच्या तयारीत आहे.’ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस