शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

पावणदोन एकरात ७० क्विंटल हळद

By admin | Updated: July 7, 2014 00:32 IST

भास्कर लांडे, हिंगोली दरवर्षी घाती घेत असलेल्या कापसाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीच्या रूपाने नगदी पिकात पर्याय मिळाला.

भास्कर लांडे, हिंगोलीदरवर्षी घाती घेत असलेल्या कापसाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीच्या रूपाने नगदी पिकात पर्याय मिळाला. त्याला हिंगोलीत उपलब्ध असलेल्या आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या बाजारपेठेमुळे अधिकच वाव मिळाला. त्याचा फायदा उठवित उपलब्ध पाण्यात, आहे त्या जमिनीत, खत, बी, फवारणीच्या वेळेचे योग्य नियोजन जीवन क्यातमवार यांनी केले. त्याचा परिपाक पावणे दोन एकरात ७० हजारांच्या खर्चात वाळून ७० क्विंटल हळद झाल्याने सव्वाचार लाखांचे उत्पन्न काढण्याची किमया माजी सैैनिकाने केली. औंढा तालुक्यातील जामगव्हाण येथील जीवन क्यातमवार यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीत वेळ घालविण्याचा ठरविले. ‘पाण्याविना शेती अन् शेतकऱ्याची माती’ या म्हणीनुसार त्यांनी शेतात बोअर घेतला. योगायोगाने बऱ्यापैैकी पाणी लागल्याने शेती फुलविता आली. पाण्याची उपलब्धता झाली तरी केळी, संत्रा, पपई आदी फळपिके घेण्यापुरते भरमसाठ पाणी नव्हते. अधिक पाण्याचे पिकही घेता येत नव्हते आणि सात एकरातील पिकांना पाणी पुरत नव्हते. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाने शेतकऱ्यांना बेजार केले होते. भरमसाठ खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नव्हते. उलट जमिनीतील कस नाहीसा होत होता. सुरूवातीला एक-दोन वर्षांत क्यातमवार यांना कापसाच्या पिकाचा अनुभव वाईट आला. म्हणून कापसाला दूर लोटीत क्यातमवार यांनी हळदीला जवळ केले. हळद पिकविण्यापेक्षा विकण्याला सर्वात महत्व असते. प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने हळदीला नकारले जाते; पण राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ हिंगोलीत आहे. वर्षभर बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम भाव मिळतो. शिवाय हळदीलाही रास्त भाव मिळत असल्याचे पाहून क्यातमवार यांनी गतवर्षी मृगनक्षत्रात पावणे दोन एकर जमीन हळद लागवडीसाठी तयार केली. जमिनीची योग्य मशागत करून शेलम जातीच्या १५ क्विंटल बियाण्यांची लागवड बेड पद्धतीने केली. २१ दिवसानंतर निघालेल्या हळदीला बरोबर एक महिना झाल्यानंतर पोटॅश आणि १०:२४:२४ खताचे सात पोते टाकले. दरम्यान पीक वाढत जात असताना कोळपणी, निंदणी करण्यात आली. हळदीला माल लागतेवेळी ६ पोते डीएपी आणि चार पोते पोटॅश खताचा दुसरा डोस दिला. एकीकडे पीक वाढत असताना आलेल्या धुईमुळे रोगराईचे आक्रमण होत राहिले. खासकरून बुरशीची वाढ होत राहिल्याने चारवेळेस फवारणी करावी लागली. मान्सूनचा पाऊस संपताच ठिबकद्वारे पिकास पाणी दिले. परिणामी पाण्याची बचत झाली, पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्याने फळधारणा चांगली झाली. नुकत्याच संपलेल्या हंगामात काढण्यात आलेली हळद वाळविण्यात आली. वाळवून मोजलेली हळद ७० क्विंटल भरली. दुर्देवाने बाजारभाव घसरून ६ हजारांवर आल्याने हळद विक्री लांबविली. वर्षभर दिवसरात्र एक करून लावलेली हळद विक्रीला येताच भाव घसरल्याने क्यातमवार निराश झाले; परंतु आजघडीला उपलब्ध ६ हजारांच्या भावात ७० क्विंटल हळद विकली तरी सव्वाचार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. केवळ ७० हजारांच्या खर्चात यापूर्वी कोणत्याही पिकाचे उत्पादन झाले नव्हते. कितीही खर्च केला तरी कापूस अपेक्षीत उत्पादन देत नव्हता; पण हळदीने केलेल्या खर्चाची चीज करीत विक्रमी ७० क्विंटल उत्पादन दिले. आता हळदीच्या रूपयाने नगदी पिकात पर्याय मिळाला. तर कमी खर्चात, कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेण्याचा आटोपही आल्याचे क्यातमवार म्हणाले.