फौजी ढाब्याला ठोकले ताळे
By Admin | Updated: January 7, 2015 01:04 IST2015-01-07T00:38:09+5:302015-01-07T01:04:35+5:30
औरंगाबाद : पालिकेच्या करमूल्यांकन व संकलन विभागाने आज पडेगाव परिसरातील फौजी ढाब्याला मालमत्ता कर थकविल्यामुळे ताळे ठोकले.

फौजी ढाब्याला ठोकले ताळे
औरंगाबाद : पालिकेच्या करमूल्यांकन व संकलन विभागाने आज पडेगाव परिसरातील फौजी ढाब्याला मालमत्ता कर थकविल्यामुळे ताळे ठोकले. पालिका कर्मचाऱ्यांसोबत ढाबा मालकाच्या सांगण्यावरून काही कर्मचाऱ्यांनी वाद घातला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
सहा वर्षांपासून ढाबा मालकाकडे १२ लाख रुपयांचा कर थकला आहे. त्यातील ३ लाख मंगळवारी सायंकाळी व उर्वरित रक्कम बुधवारी देण्याचे ढाबा मालक देणार असल्यामुळे ढाब्याचे ताळे काढण्याचा निर्णय रात्री उशिरा झाला, असे प्रभारी करसंकलन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. झनझन म्हणाले, साडेचार हजारांचा कर थकित होता. तो वाढत-वाढत सव्वादोन लाखांपर्यंत गेला. १२ लाख रुपये कर त्यांच्याकडे थकला. ३ लाख भरण्यास ढाबा मालक तयार झाला. ७ लाख रुपयांचा धनादेश बुधवारी देणार आहे. मालकाने धमकी देण्याचा प्रयत्न केल्याने तणाव झाला होता. सभापती वाघचौरे यांच्याकडे ढाबामालक येऊन बसला होता.