सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
By Admin | Updated: December 24, 2014 01:00 IST2014-12-24T00:55:56+5:302014-12-24T01:00:57+5:30
येरमाळा : कळंब तालुक्यातील रत्नापूर येथील सरपंच सुरेखा वसंत जाधवर यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंगळवारी ७ विरुद्ध ० अशा मतांनी संमत करण्यात आला.

सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
येरमाळा : कळंब तालुक्यातील रत्नापूर येथील सरपंच सुरेखा वसंत जाधवर यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंगळवारी ७ विरुद्ध ० अशा मतांनी संमत करण्यात आला.
मासिक बैठक न घेताच प्रोसेडिंगवरील सह्या घेतल्या जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. याबरोबरच विकासकामांबाबतही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने १७ डिसेंबर रोजी विश्वास मत घेण्याची विनंती सदस्यांनी तहसीलदारांकडे केली होती.
या अनुषंगाने मंगळवारी तहसीलदार वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष सभा झाली. या बैठकीला सरपंच जाधवर यांच्यासह एक सदस्य गैरहजर राहिल्याने तहसीलदारांनी ७ विरुद्ध ० अशा मतांनी अविश्वास ठराव संमत झाल्याचे जाहीर केले.
सभेला ग्रामपंचायत सदस्या कविता लोमटे, नारायण जाधवर, किसन जाधवर, अंबुबाई जाधवर, प्रयागबाई जाधवर, दिगंबर वाघमारे, रतन वाघमारे यांची उपस्थिती होती. तर प्रशासनातर्फे नायब तहसीलदार एन. जी. शिंदे, तलाठी व्ही.ए. लोमटे, मंडळ अधिकारी नामदेव भिसे, ग्रामसेवक भगत उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी डी.जी. चिखलीकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)