शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मनपाच्या सर्वसाधारण सभेत मिळाली सर्व विषयांना मंजुरी

By admin | Updated: January 31, 2017 00:11 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. दुपारी ३.३० वाजता सुरू झालेली ही सर्वसाधारण सभा उशिरापर्यंत चालल्याने बहुतांश महिला सदस्यांनी सभेतून काढता पाय घेतला. महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने कदाचित ही शेवटची सर्वसाधारण सभा असल्याचे सांगण्यात येत आहे. महापौर अ‍ॅड. दीपक सूळ यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. यावेळी आयुक्त रमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दलित वस्ती योजनेंतर्गत रद्द केलेल्या कामांचा फेरप्रस्ताव सादर करून सदस्यांनी सुचविलेल्या कामाच्या नावात व ठिकाणांत बदल करण्यास मंजुरी देण्यात आली. मनपा हद्दीत असलेल्या माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्यासाठी माजी सैनिक संघटनेकडून आलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली. उपनिबंधक जन्म-मृत्यू म्हणून सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्याबाबत मंजुरी देण्यात आली. लातूर श्रमिक पत्रकार संघाच्या मीडिया सेंटर, शहरात विविध ठिकाणी सेवाभावी संस्थेमार्फत ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुलभ शौचालय बांधण्यासाठी जागा देण्याबाबतही मंजुरी देण्यात आली. शादीखाना, ईदगाह मैदानासाठी अतिरिक्त जागा खरेदी, अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधणे, नवबौद्ध बांधवांसाठी विपश्यना सेंटरसाठी जागा खरेदी करण्यासाठीही मंजुरी देण्यात आली. याशिवाय, पं. दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बेघरांना घरे बांधण्यासाठी जागा निश्चित करण्यासही मंजुरी दिली. ही बैठक उशिरापर्यंत चालल्याने बहुतांश महिला सदस्यांनी बैठक संपण्यापूर्वीच सभागृह सोडले. (प्रतिनिधी)