शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

अपील खारीज; शिक्षा कायम

By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST

हिंगोली : अधिकाऱ्यास मारहाण करून अडथळा आणल्या प्रकरणी आरोपी गणपत हरिबा चव्हाण यास सुनावलेली शिक्षा अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.

हिंगोली : अधिकाऱ्यास अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने आरोपी गणपत हरिबा चव्हाण (रा. हिंगोली) यास सुनावलेली दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. १३ आॅगस्ट रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहाय्यक भुवैज्ञानिक रविंद्र शेलार हे ९ आॅक्टोबर २००६ रोजी रात्री ८.३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना पाणी पुरवठ्या संबंधी माहिती देण्यासाठी आपल्या कार्यालयात काम करीत होते. त्याच कार्यालयातील वाहनचालक गणपत हरिबा चव्हाण याने त्या ठिकाणी परवानगीशिवाय जावून शेलार यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच ‘आॅफीस काय तुझ्या बापाचे आहे का?’ असे म्हणून शर्टाची कॉलर पकडून तोंडावर बुक्क्याने मारहाण केली व शेलार यांना खुर्चीतून उठू दिले नाही. सेवक भांडण सोडविण्यास गेला असता त्यालाही धमकावले. या प्रकरणी रवींद्र शेलार यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणपत चव्हाण याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. त्यात आरोपी चव्हाण यास शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीच्या वतीने ४ एप्रिल २००९ रोजी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल करण्यात आले. सदरील अपिलात १ आॅगस्ट रोजी तर्द्थ अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.आर. रघुवंशी यांच्यासमोर युक्तीवाद झाला. यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानदेव टेकनुर यांनी बाजू मांडली. या प्रकरणात दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकुण घेतल्यानंतर १३ आॅगस्ट रोजी न्या. रघुवंशी यांनी आरोपी गणपत चव्हाण याचे अपिल खारीज करून कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. (प्रतिनिधी)नेमकी काय होती शिक्षा?अधिकाऱ्यास शिवीगाळ व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला होता.३० मार्च २००९ रोजी या खटल्याचा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला होता.न्यायालयाने आरोपी गणपत हरिबा चव्हाण (चालक, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, रा. जि. प. कर्मचारी वसाहत, हिंगोली) यास कलम ३३२ भादंविनुसार २ वर्षे सश्रम कारावास व १०० रुपये दंड, कलम ३५३ नुसार १ वर्षे सश्रम कारावास व १०० दंड, कलम ३४१ नुसार १ महिना सश्रम कारावास व १०० रुपये दंड, कलम ५०६ भादंवि अन्वये ६ महिने साधा कारावास व १०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती.