राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या अनुष्काला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:48 IST2018-03-25T00:46:49+5:302018-03-25T00:48:46+5:30

पुणे येथे सुरू असलेल्या ३४ व्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या अनुष्का भाजीभकरे हिने सुवर्णपदक जिंकले. अनुष्काने हे सुवर्णपदक १२ वर्षांखालील वयोगटात व १६ किलोखालील वजन गटात पटकावले.

Anukkela Gold of Aurangabad in National Taekwondo Championship | राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या अनुष्काला सुवर्ण

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या अनुष्काला सुवर्ण

औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या ३४ व्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या अनुष्का भाजीभकरे हिने सुवर्णपदक जिंकले. अनुष्काने हे सुवर्णपदक १२ वर्षांखालील वयोगटात व १६ किलोखालील वजन गटात पटकावले. अनुष्काने चंदीगड, दीव दमन, आंध्र प्रदेश व अन्य राज्यांतील प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत गोल्डन कामगिरी केली. या यशाबद्दल राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेचे सचिव प्रभात शर्मा, महाराष्ट्राचे अनिल झोडगे, किरण सानप, संदीप ओंबासे, डॉ. प्रसाद कुलकर्णी, रूपेश शिंदे, प्रशिक्षक सुरेश जाधव यांनी अनुष्काचे अभिनंदन केले.

Web Title: Anukkela Gold of Aurangabad in National Taekwondo Championship