अँथ्रॅक्सची पशुपालकांत भीती
By Admin | Updated: April 7, 2016 01:05 IST2016-04-07T01:02:56+5:302016-04-07T01:05:53+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात मेंढ्यांमध्ये अँथ्रॅक्स नावाच्या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

अँथ्रॅक्सची पशुपालकांत भीती
औरंगाबाद : मराठवाड्यात मेंढ्यांमध्ये अँथ्रॅक्स नावाच्या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अँथ्रॅक्सचा प्रसार रोखण्यााठी बंगळुरूहून हजार लस मागवून लसीकरण सुरू करण्यात आले. अधिकृत निदान होताच अवघ्या ३६ तासांत ही लस येथे मागविण्यात आली.
परभणी जिल्ह्यातील भारस्वाडा येथे नुकताच दीडशेहून अधिक मेंढ्यांचा तडकाफडकी मृत्यू झाला. पुणे येथील प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने पाठविले असता हे मृत्यू अँथ्रॅक्समुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. अँथ्रॅक्स हा भयंकर विषाणूजन्य आजार आहे. त्याची लागण प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या औरंगाबादेतील कार्यालयाकडून तातडीने सूत्रे हलविली गेली. अँथ्रॅक्सची लस केवळ बंगळुरू येथे उपलब्ध होतो. तेथे जाऊन ती आणण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागणार होता. तोपर्यंत आजाराचा प्रसार वाढण्याची भीती होती. त्यामुळे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. एम. एन. आठवले, पशुसंवर्धन पर्यवेक्षक आर. बी. शितळे, डॉ. चौधरी यांनी बंगळुरू येथील परिचित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना तेथून लस ताब्यात घेऊन कुरिअरने औरंगाबादकडे रवाना करण्याची विनंती केली. त्यानुसार लगेचच सोमवारी ही लस औरंगाबादेत उपलब्ध करून देण्यात आली. येथून ही लस परभणीत पाठविण्यात आली. नंतर तेथे मंगळवारी आणि बुधवारी मेंढ्यांना लसीकरण करण्यात आले. सद्य:स्थितीत मराठवाड्यात एक हजार लस उपलब्ध आहे.