‘लोकमत सखी मंच’तर्फे अंताक्षरी स्पर्धा
By Admin | Updated: July 21, 2014 00:22 IST2014-07-20T23:31:50+5:302014-07-21T00:22:43+5:30
लातूर : लोकमत सखी मंचच्या वतीने २१ जुलै रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ३ वाजता ‘अंताक्षरी’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.

‘लोकमत सखी मंच’तर्फे अंताक्षरी स्पर्धा
लातूर : लोकमत सखी मंचच्या वतीने २१ जुलै रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ३ वाजता ‘अंताक्षरी’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जुन्या-नव्या गाण्यांची मैफल रंगणार आहे.
स्पर्धा तीन फेरीत होणार असून, पहिली फेरी बॉलिवूड गाणी, दुसरी फेरी शब्दांवरून गाणी, तिसरी फेरी बझर राऊंड असेल. असे या स्पर्धेचे नियोजन असून, स्पर्धेत तीन सखींचा एक संघ असेल. या स्पर्धेच्या संचलनासाठी प्रसिद्ध निवेदक व गायक संदीप पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. खास सखी मंच सदस्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, सोबत ओळखपत्र असणे आवश्यक आहे. द्वारकादास श्यामकुमार, राजभोग आटा, मनोजा एजन्सी, बी.बी. ईटकर शॉपी, फन अॅण्ड जॉय आईस्क्रीम, लाईफ स्टाईल, फॅशन डिझायनिंग यांच्याकडे स्पर्धेचे प्रायोजकत्व आहे. प्रतीक्षा राजेमाने ८६२४८६१३०९, ओंकार धर्माधिकारी ९०९६३५९३९८, अमोल रणखांब ९९६०२५७३३३ यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.