शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

उत्तरपत्रिका लिहावी नेटकी...जाणून घ्या सोपे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 5:43 PM

तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले उत्तरपत्रिका लिहिण्याचे सोपे नियम

ठळक मुद्दे सुसूत्रता, वळणदार अक्षर, सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा यांचा अभाव भाषण, संभाषण, श्रवण आणि लेखन हे चार मुद्दे भाषा कौशल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

औरंगाबाद : बारावीच्या परीक्षा आता संपत आल्या असून, या आठवड्यातच शालांत परीक्षांची सुरुवात होत आहे. बारावीच्या मुलांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो; पण दहावीचे विद्यार्थी मात्र ‘बोर्ड’ या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळेच मुलांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहिता यावीत, म्हणून ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ असा सल्ला ‘लोकमत’च्या माध्यमातून डॉ. नागेश अंकुश यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी याकडे देतात. या सगळ्यामध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते आणि ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षराचा आकार मात्र नंतर प्रत्येक पानागणिक अधिकच बेढब होत जातो. याविषयी सांगताना डॉ. नागेश म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना नेहमीच होते. काही मोजक्या उत्तरपत्रिका सोडल्या तर उर्वरित उत्तरपत्रिकांमध्ये लिखाणातील सुसूत्रता, वळणदार अक्षर, सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ हा उपक्रम राबविण्यात आला आणि याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. 

उत्तरपत्रिका लिखाणाचे काही नियम, विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरज - अक्षर चांगले असेल तर लेखनाला अधिक गुण मिळू शकतात. त्याउलट खराब अक्षरामुळे ‘देय’ असलेले गुणही आपल्या पदरी पडणार नाहीत.- उत्तरातील नेमकेपणा, आटोपशीरता महत्त्वाची असून परीक्षेतील सलग तीन तास लेखनाचा वेग कायम ठेवावा.- परीक्षेसाठी वापरण्यात येणाºया पेनाचा हाताला सराव झालेला असावा. अगदी नवा कोरा पेन नेणे टाळावे.- उत्तरे लिहिताना मजकुरातील महत्त्वाचा भाग अधोरेखित करावा. अधोरेखा आवश्यक तितकीच असावी. ती बटबटीत दिसू नये याची काळजी घ्यावी.- सारांश लेखन करताना परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पना, विचार, मुख्य आशय लक्षात घ्यावा. आशयसूत्र बदलू नये, याची काळजी घ्यावी.- प्रत्येक ओळीत बसणारी शब्दसंख्या प्रमाणबद्ध असावी. खूप दूर किंवा खूप जवळ अक्षरे काढणे टाळावे.- घाईघाईत लिहिताना अनावधानाने वाक्य सदोष होते. त्यामुळे जे लिहीत आहात, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. खाडाखोड टाळावी.- विरामचिन्हांचा वापर उत्तरपत्रिकेत अचूक असावा.- उत्तरलेखनात कृत्रिम वा पुस्तकी भाषा टाळून स्वत:च्या भाषेतील उत्तरेच प्रभावीपणे मांडावीत.- परिच्छेदाची सुरुवात पानाच्या डावीकडे साधारण १ सेंटीमीटर अंतर ठेवून केलेली असावी आणि एका परिच्छेदात शक्यतो एकाच विवेचनाचा मुद्दा लिहिलेला असावा.- शक्यतो क्रमवार उत्तरे लिहावीत, प्रश्न काळजीपूर्वक वाचावे, लिहिलेला बैठक क्रमांक तपासून घ्यावा. 

उत्कृष्ट उत्तरपत्रिकेचे तीन पैलू- अक्षर- समान उंची, योग्य अंतर, शिरोरेषा, डावीकडे- उजवीकडे न झुकू देता उभे सरळ काढलेले अक्षर.- लेखनपद्धती- अभ्यासपूर्ण, संदर्भसंपन्न, अचूकता, स्वत:ची भाषा, व्यवस्थितपणा, आखीव- रेखीव, शुद्धता, आकर्षक, विरामचिन्हांचा अचूक वापर.- उत्तरलेखन- प्रस्तावना, मुद्देसूदपणा, वेधक, समास, नेमकेपणा, उपसमास व क्रमांक़

लेखन कौशल्य आवश्यकभाषण, संभाषण, श्रवण आणि लेखन हे चार मुद्दे भाषा कौशल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी जो काही अभ्यास केला आहे, तो योग्य पद्धतीने त्यांच्या उत्तरातून समोर येणे गरजेचे असते. याशिवाय स्पर्धा परीक्षा सोडल्यास उर्वरित सर्व परीक्षा या लेखी स्वरूपाच्याच असतात. त्यामुळे फक्त बोर्डाच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर उच्चशिक्षण घेणारे, राज्यसेवा, लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांनीही उत्तरपत्रिका लिहिताना काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. नागेश अंकुश

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीSchoolशाळा