शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

विद्यापीठात बोगस कागदपत्राने आणखी एकाचा पीएच.डी. प्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:11 IST

विद्यापीठाने गुन्हा दाखल करण्याची रिपाइंची मागणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाेगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या दोन शिक्षण संस्थाचालकावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. त्याच पद्धतीने आणखी एकाने पीएच.डी.ला प्रवेश घेतल्याचे कागदपत्रे समोर आली आहेत. या संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी रिपाइंतर्फे (आठवले गट) कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना रिपाइंचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी निवेदन दिले. या निवेदनानुसार प्राणीशास्त्र विषयात सिद्दीक मोहमद शोएब हबीबोद्दीन याने नोव्हेंबर २०२१ मध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यासाठी महात्मा गांधी विद्यापीठ, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे बी.एस्सी. व एम.एस्सी. अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांवर संशय असल्यामुळे गायकवाड यांनी महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू, परीक्षा संचालकांशी संपर्क साधत संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या अभिलेखांमध्ये सिद्दीक याने शिक्षण घेतल्याची नोंद आढळली नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्यावरही विद्यापीठाने कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान व सहसचिव मकसूद खान यांच्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. याविषयी सिद्दीकी मोहम्मद शोएब यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

तीन आरोपींना मिळाला जामीननागराज गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार विद्यापीठ प्रशासनाने पडताळणी केल्यानंतर पीएच.डी.ला प्रवेश घेणारे आस्मा खान, मकसूद खानच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात २६ मार्च रोजी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात ३० मार्चला आस्मा खानला अटक झाली. तिचा पती मजहर खानला ६ एप्रिल रोजी अटक झाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणारा शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान आणि डॉ. शंकर अंभोरेला १८ एप्रील रोजी अटक केली. या पाच आरोपींशिवाय दिल्लीच्या राजीवसिंग प्रेमसिंग अरोरा यास ६ मेला अटक केले. आरोपीमधील मकसूद खानला अटकपूर्व जामीन मिळाला हाेता, तर १५ मे रोजी आस्मा खान, मजहर खान आणि शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान या तिघांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. डॉ. अंभोरे आणि अरोरा हे दोघे कारागृहातच आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी